Kalki 2898 AD Collection : दीपिका-प्रभासच्या ‘कल्की २८९८ एडी’ची बॉक्स ऑफिसवर जादू, पहिल्या विकेंडमधील कमाईचा आकडा ३०० कोटीपार

Kalki 2898 AD 4th Day Box Office Collection : नागअश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाने चार दिवसांत ३०० कोटींचा टप्पा गाठलेला आहे.
Kalki 2898 AD Collection : दीपिका-प्रभासच्या ‘कल्की २८९८ एडी’ची बॉक्स ऑफिसवर जादू,  पहिल्या विकेंडमधील कमाईचा आकडा ३०० कोटीपार
Kalki 2898 AD Poster Saam Tv

नागअश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रभास आणि दीपिका पादुकोण स्टारर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना रिलीजच्या आधीपासूनच उत्सुकता होती. सायन्स आणि फिक्शन असलेल्या ह्या चित्रपटाला कलियुगाची आणि आधुनिकतेची जोड देण्यात आलेली आहे. चित्रपटाने एकट्या भारतात फक्त चार दिवसांत ३०० कोटींचा टप्पा पार केलेला आहे. नुकताच सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर केलेला आहे.

Kalki 2898 AD Collection : दीपिका-प्रभासच्या ‘कल्की २८९८ एडी’ची बॉक्स ऑफिसवर जादू,  पहिल्या विकेंडमधील कमाईचा आकडा ३०० कोटीपार
Shatrughan Sinha : शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात का झाले दाखल? आजाराची माहिती आली समोर; सोनाक्षी-झहीरही पोहोचले हॉस्पिटलमध्ये

६०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रदर्शनाच्या आधीपासूनच जोरदार चर्चा सुरू होती. चित्रपटाने चार दिवसांत तीनशे कोटींपेक्षाही अधिकची कमाई केलेली आहे. सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने चार दिवसांत ३०२ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने पहिल्या विकेंडला म्हणजेच रविवारी ८५ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने तेलुगु भाषेत ३६.८० कोटींची कमाई, हिंदी भाषेत ३९ कोटींची कमाई, तामिळ भाषेत ५. ५० कोटींची कमाई, मल्याळम भाषेत ३ कोटींची कमाई तर कन्नड भाषेत फक्त ७ कोटींची कमाई केलेली आहे.

चित्रपटाने पहिल्या दिवशीच सर्वाधिक कमाई केलेली होती. पण त्यानंतर चित्रपटाने थोडी कमीच कमाई केलेली दिसत आहे. सायफाय चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भगवान विष्णू यांचा दहावा अवतार असलेल्या कल्कीवर आधारित हा चित्रपट आहे. २०२४ मधील बिगबजेट चित्रपटांच्या यादीत ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाचा समावेश झालेला आहे. चित्रपटामध्ये AI टेक्नोलॉजी, ग्राफिक्स, ॲनिमेशन सारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे.

Kalki 2898 AD Collection : दीपिका-प्रभासच्या ‘कल्की २८९८ एडी’ची बॉक्स ऑफिसवर जादू,  पहिल्या विकेंडमधील कमाईचा आकडा ३०० कोटीपार
Dharmveer 2: 'धर्मवीर' पुन्हा येतायत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज

2D सोबतच हा चित्रपट IMAX आणि 3D फॉर्मेटमध्येही रिलीज झालेला आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दुल्कर सलमान, कमल हसन, दिशा पटानी अशी तगडी स्टारकास्ट आहे. प्रेक्षक, सेलिब्रिटी आणि समीक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Kalki 2898 AD Collection : दीपिका-प्रभासच्या ‘कल्की २८९८ एडी’ची बॉक्स ऑफिसवर जादू,  पहिल्या विकेंडमधील कमाईचा आकडा ३०० कोटीपार
Kalki 2898 AD Star Cast Fee : दीपिका-प्रभास ते बिग बींपर्यंत..., 'कल्की २८९८ एडी'साठी तगडं मानधन कोणी घेतले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com