Kalki 2898 AD चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका; कलेक्शन किती?

Kalki 2898 AD Day 1 Collection : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभास- दीपिकाच्या 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटाचे समीक्षकांसह प्रेक्षकांनी जोरदार कौतुक केले आहे.
Kalki 2898 AD चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका; कलेक्शन किती?
Kalki 2898 AD Poster Saam Tv

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभास- दीपिकाच्या 'कल्की २८९८ एडी' Kalki 2898 ad चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, कमल हासन अशी एक से बडकर एक तगडी स्टारकास्ट या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. टॉलिवूडसह बॉलिवूडमधील दमदार स्टारकास्ट चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. सध्या ह्या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून समीक्षकांसह प्रेक्षकांनी चित्रपटाचे जोरदार कौतुक केले आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल...

Kalki 2898 AD चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका; कलेक्शन किती?
Sonakshi- Zaheer Dance Viral Video : सोनाक्षी- इक्बालने रिसेप्शन पार्टीत 'छैय्या- छैय्या' गाण्यावर केला जबरदस्त डान्स, हूक स्टेप्सची होतेय चर्चा

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका पाहायला मिळत आहे. ॲडवान्स बुकींगमध्येच चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. याशिवाय पहिल्याच दिवशी चित्रपटाचे देशभरातल्या अनेक थिएटर्समध्ये शो हाऊसफुल होते. प्रभास- दीपिकाच्या 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाने पहिल्याच दिवशी 'केजीएफ २' चित्रपटांसह अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ९५ कोटींची कमाई केलेली आहे. सायन्स फिक्शन आणि फ्युचरिस्टिक चित्रपटाच्या कमाईमुळे बॉक्स ऑफिसचा दुष्काळ संपला आहे, असं म्हटलं जात आहे.

चित्रपटाच्या कमाईचे आकडे प्रसिद्ध करणाऱ्या सॅकल्निक या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, 'कल्की २८९८ एडी' चित्रपट पहिल्या दिवशी देशभरात ९५ कोटींची कमाई केलेली आहे. यामध्ये सर्वाधिक कमाई तेलुगु ६४.५० कोटी, हिंदी- २४ कोटी, तमिळ- ४ कोटी, मल्याळम- २.२० कोटी, कन्नड- ३ लाख अशी कमाई चित्रपटाने केलेली आहे. अद्याप जगभरातल्या कमाईचा आकडा समोर आलेला नाही.

Kalki 2898 AD चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका; कलेक्शन किती?
Ashok Saraf New Movie : अशोक मामा 'वेड'नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार, 'लाईफ लाईन' मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

जर चित्रपटाने 200 कोटींपेक्षा अधिक कमाई केली तर सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांमध्येही या चित्रपटाचा समावेश होईल. आतापर्यंत पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम RRR चित्रपटाच्या नावावर आहे. RRR चित्रपटाने पहिल्या दिवशी २२३.५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर प्रभासचा चित्रपट 'बाहुबली २' चित्रपट आहे. त्या चित्रपटाने २१४ कोटींची कमाई केली होती.

Kalki 2898 AD चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका; कलेक्शन किती?
Baby John Released Date : 'बेबी जॉन'ची रिलीज डेट ठरली, वरुण धवन डिसेंबरमध्ये गाजवणार बिग स्क्रिन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com