Madness Machayenge : 'बाहुबली ३ मध्ये रोल मिळाला का?'; कालकेयच्या लूकमध्ये अभिनेत्याला पाहून नेटकऱ्याची भन्नाट प्रतिक्रिया

Gaurav More : फोटोमध्ये दिसणाऱ्या कालकेयला ओळखलंत का ?, त्याने आपल्या हटक्या कॉमेडीच्या जोरावर प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.
Gaurav More Kalakeya Role Look Viral
Gaurav More Kalakeya Role Look ViralSaam Tv

Gaurav More Kalakeya Role Look Viral

तुम्हाला ‘बाहुबली’ चित्रपटातला कालकेय आठवतोय का ? चित्रपटामध्ये कालकेय हे निगेटिव्ह पात्र आहे. सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्याचा कालकेयचा लूक तुफान व्हायरल होत आहे. त्या कालकेय पाहून तुम्हाला चित्रपटातला कालकेय नक्कीच आठवेन. अगदी हुबेहुब व्यक्तिरेखा वठवण्याचं काम त्या मराठमोळ्या अभिनेत्याने केले आहे. तो दुसरा तिसरा कोणीही नसून फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आहे. गौरव मोरेने हा लूक ‘मॅडनेस मचाएंगे’ या कॉमेडी शोसाठी केलेला आहे. (Marathi Actors)

Gaurav More Kalakeya Role Look Viral
Shreyas Talpade On COVID Vaccine : कोरोना व्हॅक्सिनमुळे श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका?, अभिनेता म्हणाला, 'लस घेतल्यानंतरच मला...'

गौरवने आपल्या अभिनयामुळे आणि कॉमेडीमुळे चाहत्यांना खळखळून हसवले आहे. त्याचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही परदेशातही आहे. अनेकदा परदेशात शुटिंगसाठी गेल्यावर तो त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो. मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर गौरव मोरे आता हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्येही चाहत्यांना खळखळून हसवताना दिसत आहे. ‘मॅडनेस मचाएंगे’ या कॉमेडी शोमध्ये, गौरवने ‘बाहुबली’ चित्रपटातला कालकेयचा लूक केलेला आहे. यासोबतच गौरवचा ‘भुलभुल्लैया’ चित्रपटातल्या छोट्या पंडीतचा लूकही सध्या तुफान व्हायरल होत आहे. (Televesion Actor)

त्यासोबतच गौरवचा सध्या कालकेयचा लूकही तुफान व्हायरल होत आहे. डोक्यावर जखम, विस्कटलेले केसं असा लूक दिसत आहे. हा गौरव मोरेचा ‘बाहुबली’ चित्रपटातला कालकेयचा लूक आहे. अशा विचित्र लूकमध्ये गौरवला ओळखणंही कठीण झाले आहे. सध्या गौरव मोरेच्या ह्या लूकची तुफान चर्चा होत असून चाहत्यांकडून गौरवचे सध्या कौतुक केले जात आहे. गौरव मोरेला या फोटोवर ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (Social Media)

Gaurav More Kalakeya Role Look Viral
Kareena Kapoor: करीना कपूर बनली UNICEF ची नॅशनल ब्रँड ॲम्बेसेडर; भावनिक पोस्ट करत स्वत:च दिली माहिती

कालकेयच्या भूमिकेत गौरवला पाहून नेटकरी म्हणतात, 'अरे गौऱ्या ओळखताच येत नाहीये.' 'आता शोभतोयस फिल्टरपाड्याचा बच्चन.', 'भाई बाहुबली-३ मध्ये रोल मिळाला का?', 'कडक गौऱ्या...', 'कमाल, मेकअप मॅनसाठी सलाम', 'खतरनाक... खरा कालकेय तुच दिसतोय' नम्रता संभेराव, निखिल बने, ऋतुजा बागवे, अभिनय बेर्डे, निखिल चव्हाण, प्रथमेश परब सह अनेक सेलिब्रिटींनी गौरवच्या नव्या लूकचं कौतुक केलं आहे. गौरवच्या कामाबद्दल सांगायचं तर, लवकरच 'अल्याड पल्याड' या मराठी हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौरव 'चला हवा येऊ द्या' नंतर 'मॅडनेस मचायेंगे' कार्यक्रमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (Entertainment News)

Gaurav More Kalakeya Role Look Viral
Amrita Pandey च्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com