सुपरस्टार प्रभासचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) नुकताच बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची क्रेझ फक्त दक्षिण भारतातच नव्हे तर पूर्ण भारतात आहे. २०२४ मधील बिगबजेट चित्रपटांच्या यादीत चित्रपटाचा समावेश झालेला आहे. ८५०० स्क्रीन्सवर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे . सध्या प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची जोरदार क्रेझ पाहायला मिळत असून सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रेक्षकांनी चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केलेला आहे. जाणून घेऊया प्रेक्षकांना चित्रपट कसा वाटला ?
सायफाय चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भगवान विष्णू यांचा दहावा अवतार असलेल्या कल्कीवर आधारित हा चित्रपट आहे. कलियुगावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटची क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो सकाळी चार वाजल्यापासून सुरू झालेला आहे. अनेक प्रेक्षकांनी फर्स्ट हाफनंतर चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पहिला युजर म्हणतो, "फर्स्ट हाफ खूप मस्त, ग्रेट भैरवा, नागी..." तर आणखी एक युजर म्हणतो, "खुप सुंदर चित्रपट, दिग्दर्शकांचा ध्येयही खूप सुंदर आहे. नागी मोवा यांनी चित्रपटात जबरदस्त जादू दाखवली आहे. बाकी कथानक, व्हिएफएक्स, ॲनिमेशन खूप सुंदर आहे. ॲक्शन चित्रपटाची जबरदस्त क्रेझ आहे.", " 'कल्की 2898 एडी' साय फाय आणि मायथॉलॉजी असणारा चित्रपट आहे. फर्स्ट हाफपेक्षा सेकंड हाफमध्ये सर्वाधिक अचंबित करणारा आहे. " अशी प्रतिक्रिया युजर्सने दिलेली आहे.
‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाला तेलुगू भाषेमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 2D आणि 3D फॉर्मेटमध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. चित्रपटाने १४ कोटींची कमाई केलेली आहे. सर्वाधिक कमाई तेलुगू त्यानंतर सर्वाधिक कमाई हिंदी आणि तमिळ भाषेतील आहे. रिपोर्टनुसार, प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण स्टारर चित्रपटाने आतापर्यंत प्री- बुकिंगमध्ये तब्बल १५ कोटी ७३ लाख रुपयांची कमाई केली आहे. आत्तापर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, चित्रपटाची ही कमाई निश्चित आहे. आतापर्यंत चित्रपटाची ५ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.