Adipurush Final Trailer Shared Social Media: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपट चर्चेत आला आहे. ६०० ते ७०० कोटी रूपयांचा बजेट असलेल्या या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख १६ जून आहे. अशातच आदिपुरुषचा फायनल ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची आणखीनच उत्कंठा वाढली आहे. दमदार ॲक्शन असलेल्या या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना फारच भावला आहे. अखेर चित्रपटाचा फायनल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये, साधूच्या कपड्यांमध्ये रावण सीतेकडे भिक्षा मागायला जातो. सीता जशी लक्ष्मणरेषा ओलांडते तसं रावण तिला पळून नेतो. श्रीरामांना या गोष्टीची खबर मिळताच त्यांना धक्का बसतो. जटायू रावणावर हल्ला करतो. आणि मग पुढे वानरसेना रावणाच्या लंकेवर हल्ला करते आणि रावणाच्या ताब्यातून सीतेला पुन्हा अयोध्येत येते. श्रीराम रावणाचा वध करण्यास सज्ज असतात, अशा अनेक गोष्टी आदिपुरुषच्या शेवटच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतात.
आदिपुरुषच्या फायनल ट्रेलरमध्ये व्हिएफएक्समध्ये बऱ्याच चुका दिसत आहेत. ट्रेलरमधील माकडंही कार्टूनच्या रूपात जरी दिसत असले तरी, प्रेक्षकांना हा ट्रेलर आवडला आहे. ‘प्रत्येक भारतीयाची कहाणी’ या टायटलने प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधील VFX मध्ये काही चुका असल्यातरी, प्रेक्षकांनी ट्रेलर प्रदर्शित होताच अनेक युजर्सना हा ट्रेलर आवडला आहे.
तिरुपतीमध्ये प्रभास- क्रितीच्या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले असून स्पेशल स्क्रिनिंगसाठी निर्मात्यांनी मोठी तयारी केली आहे. वैंकटश्वेरय्या विद्यापीठाच्या मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रामाच्या भूमिकेत असलेल्या प्रभासचे ५० फुटांपेक्षा अधिक उंचीचे कट आऊट्स तयार करण्यात आले. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १६ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. ‘आदिपुरूष’ चित्रपट हा संस्कृत महाकाव्य रामायणावर आधारित आहे. चित्रपट 600 कोटींच्या बिग बजेटमध्ये बनला असून या चित्रपटात भगवान रामच्या भूमिकेत साऊथचा सुपरस्टार प्रभास, माता सीता म्हणजेच जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनॉन, लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग, रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आणि महाबली हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नाग दिसणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.