Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अंबानी कुटुंबाच्या घरी लगीनघाई; अनंत- राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांच्या घरी

Mukesh Ambani Give Invitation to CM eknath Shinde: मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिक मार्चंट जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मुकेश अंबानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घरी गेले होते.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding
Anant Ambani-Radhika Merchant WeddingSaam Tv

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचे लग्न जुलै महिन्यात होणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची चर्चा सर्वत्र आहे. त्यांच्या दोघांच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर आता राधिका आणि अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका देऊन मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण दिले आहे.

Anant Ambani-Radhika Merchant Wedding
Arjun Kapoor Malaika Arora: अर्जुन-मलायकाचं पुन्हा फिस्कटलं? बर्थडे पार्टीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या...

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटी, नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या लग्नाचे स्वतः अनंत अंबानी आणि मुकेश अंबानी आमंत्रण देत आहेत. मुकेश अंबानी यांनी मुलगा अनंत अंबानी आणि राधिकासोबत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रण दिले आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुकेश अंबानी यांना फुलांचा पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करताना दिसत आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सुनेने राधिका मर्चंटला सुंदर मुर्ती दिल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना लग्नाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मुकेश अंबानी यांनी दिले आहे.

Anant Ambani-Radhika Merchant Wedding
Amitabh Bachchan Buys Property:अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केल्या ३ व्यावसायिक मालमत्ता; किंमत वाचून व्हाल थक्क

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीच्या लग्नाची चर्चा संपूर्ण जगभरात सुरु आहे. त्यांचे दुसरे प्री- वेडिंग नुकतेच पार पडले. समुद्रावर क्रूझवर प्री- वेडिंग सेलिब्रेशन झाले. यावेळी अंबानी कुटुंब आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. यानंतर आता लग्नालादेखी बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आहे.

Anant Ambani-Radhika Merchant Wedding
Jiya Shankar Video: रितेशला 'वेड' लावणारी ऑनस्क्रिन गर्लफ्रेंड माहितीये का? जिममधील तिचा VIDEO बघा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com