Amitabh Bachchan Buys Property:अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केल्या ३ व्यावसायिक मालमत्ता; किंमत वाचून व्हाल थक्क

Amitabh Bachchan Buys Property In Mumbai: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन नेहमीच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांनी नुकतेच अंधेरीतील एका बिल्डिंगमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे.
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan Saam Digital

बॉलिवूडचे महानायक म्हणून अमिताभ बच्चन यांना ओळखले जाते. अमिताभ बच्चन नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असतात. परंतु आता ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. अमिताभ बच्चन यांनी मुंबईत ३ ऑफिस खरेदी केले आहे. या प्रॉपर्टीची किंमत जवळपास ६० कोटी रुपये आहे.

मुंबईतील अंधेरी वीरा देसाई रोडवरील वीर सावरकर सिग्नेचर बिल्डिंगमध्ये त्यांनी ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे. बिग बी यांनी ६० कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याने ते चर्चेत आले आहे.

Amitabh Bachchan
Ramesh Pardeshi Post : "मुलांमुलीकडे लक्ष आहे का?",मॉलमध्ये ड्रग्ज सेवन करणारा व्हिडिओ शेअर करत पिट्या भाईचा पालकांना सवाल

Floortap.com ने दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी तीन ऑफिससाठी ५९.५८ कोटी रुपये दिले आहेत. या ऑफिसचे एकूण क्षेत्रफळ ८.४२९ स्क्वेअर फूट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी २० जून २०२४ रोजी ही मालमत्ता खरेदी केली आहे. अमिताभ बच्चन यांनी या ऑफिससाठी जवळपास ३.५७ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्यूटी भरली असल्याचे सांगण्यात येत आहे. अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेले तिन्ही ऑफिस खूप मोठे आणि प्रशस्त आहेत.

अमिताभ बच्चन यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, याच बिल्डिंगमध्ये अमिताभ बच्चन यांचे अजून चार ऑफिस आहेत. त्यांनी २०२३ मध्ये हे ऑफिस खरेदी केले होते. त्यानंतर आता अजून ३ ऑफिस खरेदी केल्याने आता एकाच बिल्डिंगमध्ये अमिताभ बच्चन यांचे एकूण सात ऑफिस आहेत.

Amitabh Bachchan
Accident Or Conspiracy Godhra चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज; पाहा Video

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, बिग बी लवकरच 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

Amitabh Bachchan
Priya-Umesh Love Story: प्रिया बापट- उमेश कामतची प्यारवाली लव्हस्टोरी माहितीये का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com