Arjun Kapoor Malaika Arora: अर्जुन-मलायकाचं पुन्हा फिस्कटलं? बर्थडे पार्टीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या...

Arjun Kapoor Malaika Arora Break Up: अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुन कपूरने काल आपल्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. त्याच्या या पार्टीला मलायका अरोरा उपस्थित नव्हती.
Arjun Kapoor Malaika Arora
Arjun Kapoor Malaika AroraSaam Tv

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुन कपूर नेहमीच चर्चेत असतो. अर्जुन कपूरने काल रात्री वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. अर्जुन कपूरच्या पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र, अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका अरोरो कुठेच दिसली नाही. त्यामुळे त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Arjun Kapoor Malaika Arora
Amitabh Bachchan Buys Property:अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केल्या ३ व्यावसायिक मालमत्ता; किंमत वाचून व्हाल थक्क

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा नेहमीच वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असतात. मलायका आणि अर्जुन गेल्या काही दिवसांपासून कुठेच एकत्र दिसले नाही. त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, आता मलायकाने अर्जुनच्या बर्थ डे पार्टीला हजेरी न लावल्याने या चर्चांना अजूनच उधाण आले आहे.

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या ब्रेकअपच्या चर्चाच सुरु होत्या. ते दोघे गेल्या काही दिवसांपासून एकत्र स्पॉट झाले नव्हते. तसेच अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सूचक पोस्ट पाहायला मिळाली. त्यामुळेच या चर्चा होत होत्या. मात्र, या दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Arjun Kapoor Malaika Arora
Ramesh Pardeshi Post : "मुलांमुलीकडे लक्ष आहे का?",मॉलमध्ये ड्रग्ज सेवन करणारा व्हिडिओ शेअर करत पिट्या भाईचा पालकांना सवाल

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुन कपूरच्या बर्थ डे पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. वरुण धवन, नताशा दलाल, जान्हवी कपूर, आदित्य रॉय हे सेलिब्रिटी उपस्थित होते.

Arjun Kapoor Malaika Arora
Priya-Umesh Love Story: प्रिया बापट- उमेश कामतची प्यारवाली लव्हस्टोरी माहितीये का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com