Navi Mumbai Accident : पुढच्या महिन्यात मर्चंट नेव्हीमध्ये जॉइन होणार होता, पण त्याआधीच नियतीनं डाव साधला! १९ वर्षांच्या तरुणासोबत काय घडलं?

Mumbai Accident News: मुंबईतील सायन पनवेल महामार्गावर उरण फाट्याजवळील सर्व्हिस रोड एक अपघात घडला आहे. या महामार्गावरील अपघातात एका १९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. हे हिट अँड रनचे प्रकरण आहे.
Navi Mumbai Accident
Navi Mumbai AccidentYandex

मुंबईतील सायन पनवेल महामार्गावर उरण फाट्याजवळील सर्व्हिस रोड एक अपघात घडला आहे. या महामार्गावर हिट अँड रन प्रकरणात एका १९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सर्व्हिस रोडने जात असताना एका अज्ञात वाहनाने पीडित मुलाच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत १९ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे हा अपघात झाला. हा अपघाट हिट अँड रनचे प्रकरण आहे. समर्थ सारिका कराळे असे मृत मुलाचे नाव आहे. तो मंगळवारी मित्रांना भेटायला मुंबईला गेला होता. त्यानंतर तो उलवे येथे घरी परतत असताना त्याचा हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ याने मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवली होती. पुढच्या महिन्यापासून तो ड्युटीवर रुजू होणार होता. परंतु त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडला. समर्थचा अपघात ज्या ठिकाणी झाला. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने आरोपीला ओळखणे आणि वाहनाचा शोध घेणे हे आव्हान असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

समर्थला त्याच्या आईने एकट्याने वाढवले होते. तो एक ग्रोसरी अॅपसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. त्याला मंगळवारी सुट्टी होती. त्यामुळे तो नवी मुंबईतील कामोठे येथे आपल्या मित्रांना भेटायला गेला होता. तो स्कूटीवर कामोठ्याला गेला होता. बुधवारी पहाटे २ च्या सुमारास समर्थने आपल्या काकांना मेसेज केला होता. काही वेळातच तो घरी पोहचेन असे त्याने सांगितले होते. मात्र, काही तास उलटून गेले तरी समर्थ घरी आला नव्हता. त्यानंतर दोन तासांनी समर्थच्या अपघाताची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली

Navi Mumbai Accident
Mumbai Crime News Today: बोरिवलीत शेअर रिक्षातून जाणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सहप्रवाशावर गुन्हा! रिक्षाचालकालाही अटक

समर्थला जवळच्याच डॉ डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु पहाटे ३.४५ च्या सुमारास त्याला मृत घोषित करण्यात आले. समर्थच्या अपघाताची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.

Navi Mumbai Accident
Akola Crime News: प्रेमात अडसर ठरत होती बायको; नवऱ्याने गाठला विकृतीचा कळस, मित्राच्या मदतीने बनवले अश्लील व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com