Akola Crime News: प्रेमात अडसर ठरत होती बायको; नवऱ्याने गाठला विकृतीचा कळस, मित्राच्या मदतीने बनवले अश्लील व्हिडिओ

Husbanad Make Wife Obscene Video: अकोल्यातल्या पातुर तालुक्यातल्या एका गावात नवऱ्याने बायकोचे अश्लील व्हिडिओ काढले आहेत. प्रेयसीसाठी बायकोला आयुष्यातून दूर करण्यासाठी त्याने ही योजना केल्याचं समोर आलं आहे.
Akola Crime News
Akola Crime NewsYandex

विदर्भातील अकोला (Akola) जिल्ह्यात घरगुती वादानं एक भयंकर टोक गाठलं आहे. प्रेयसीसाठी पत्नीला आयुष्यातून दूर करण्यासाठी नवऱ्याने विकृतीचा कळस गाठला आहे. यासाठी नवऱ्याने योजना रचल्याचं समोर आलं आहे. त्याने मित्राच्या मदतीनं बायकोचे अश्लील व्हिडिओ तयार करीत सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत. इतकेच नव्हे तर, त्याने ते व्हिडिओ नातेवाईकांनाही पाठवले आहेत. हा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातल्या पातुर तालुक्यातल्या चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत घडला (Husband Affair) आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नवऱ्यासह त्याचा मित्र मुस्तकीन शेख यासीन शेख याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास चान्नी पोलिस करीत आहेत. याप्रकरणी मुस्तकीनला अटक करण्यात आली आहे.

अकोल्यातल्या पातुर तालुक्यातल्या एका गावात श्वेता आणि राहुल (बदलेली नावं) हे दोघे पती-पत्नी अनेक दिवसांपासून राहत होते. दोघांमध्ये काही दिवस चांगले राहिले. पण कालांतराने पती राहुल यांच्या मोबाईलवर पुजा (बदलेलं नाव) नावाच्या महिलेचा सतत फोन यायला लागले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाले. पुढं 'पूजा' आणि 'श्वेता'चं एका दिवशी फोनवर कडाक्याचं भांडण (Husbanad Make Wife Obscene Video) झालं. त्यांचा हा वाद राहुलला समजला. राहुलनं पत्नी श्वेताला हटकलं. आमचा काम आणि एका व्यवसाय संदर्भात नेहमी संपर्क राहतो. त्यामुळं 'तू' लक्ष देऊ नको, अशा शब्दांत सांगितलं.

श्वेताने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, साधारण जानेवारी (2024) महिन्यात मला फोनवर एक धमकी आली. धमकी देणारा तरुण हा नवऱ्याचा मित्र मुस्तकीन शेख होता. त्याने दिलेली धमकी ऐकून पायाखालीची जमिन सरकली. त्याने काही अंघोळ करतांना आणि इतर अश्लिल बनावट व्हिडीओ तयार केले होते. यामध्ये हुबेहुब तूच दिसते, अशी धमकी देत शरीर सुखाची मागणी करत होता. पीडित महिलेनं या गोष्टींना स्पष्ट नकार दिला. त्यानंतर तिने हे प्रकरण नवऱ्याच्या कानावर टाकलं.

श्वेताला धमकी देऊनही दोन महिने उलटले, पण काही प्रतिसाद मिळत नव्हता. हे पाहुन मुस्तकीनने थेट तिच्या नवऱ्यालाच ते व्हिडिओ पाठवले. फोन करून सांगितलं की, तुझ्या नवऱ्यानेच मला हे व्हिडीओ बनवायला (Crime News) सांगितले. तुझ्यासोबत अनैतिक संबंध बनविण्याकरीता सांगितलं आहे. जेणेकरून त्याला पुजासोबत (प्रेयसी) संबंध ठेवता येतील. तूला घटस्फोट देता येईल. हे ऐकुण श्वेताला धक्का बसला. या संदर्भात तिने नवऱ्याला विचारणा केली असता, माझ्या सांगितल्यानुसारच हे सर्व झाल्याचं तो म्हटला.

Akola Crime News
Pune Crime News : फोटो व्हायरल करायची धमकी देत मुलीवर अत्याचार; पुण्यातील धक्कादायक घटना

पुढं राहूलने श्वेताला धमकी दिली. माहेरी जायला सांगितलं. याबाबत कोणालाही सांगू नको. सांगितल्यास तुझे बनावट व्हिडीओ वायरल करणार, अशी धमकी दिली. तिने त्याला विनंती केली. पण त्याने तिला अमानुषपणे मारहाण झाली. घराबाहेर काढुन दिलं, असंही तक्रारीत नमूद केलं आहे. अखेर एका दिवशी राहुलने मित्राच्या मदतीनं बायकोचे बनावट व्हिडीओ नातेवाईकांना पाठवले. त्यामुळे पीडितेची मोठी बदनामी झाली. सबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती तिने केली आहे. दरम्यान नवऱ्यासह अन्य एकावर ३५४(क) (ड), ३२३,५०१,५०६ भादवी RW ६७ (अ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Akola Crime News
Mumbai Crime News Today: बोरिवलीत शेअर रिक्षातून जाणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सहप्रवाशावर गुन्हा! रिक्षाचालकालाही अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com