Mumbai Crime News Today: बोरिवलीत शेअर रिक्षातून जाणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सहप्रवाशावर गुन्हा! रिक्षाचालकालाही अटक

Borivali News Today: बुधवारी सकाळी महिला शेअर रिक्षातून प्रवास करत असताना हा प्रकार घडला. सहप्रवाशाकडून 29 वर्षीय महिलेचा रिक्षातच विनयभंग केला, असा आरोप करण्यात आलाय.

मुंबई : मुंबईच्या बोरिवली मध्ये धक्कादायक घटना घडली. बोरिवलीमध्ये रिक्षातून जात असणाऱ्या सहप्रवाशाकडून एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या महिलेनं धावत्या रिक्षेतूनच उडी मारल्याचा प्रकार समोर आलाय. तर रिक्षा चालक आणि विनयभंग करणाऱ्या संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास केला जातोय. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. रिक्षातून प्रवास करणं महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही? असा सवाल या घटनेमुळे आता उपस्थित केला जातोय. बुधवारी सकाळी महिला शेअर रिक्षातून प्रवास करत असताना हा प्रकार घडला. सहप्रवाशाकडून 29 वर्षीय महिलेचा रिक्षातच विनयभंग केला, असा आरोप करण्यात आलाय. मदतीसाठी महिलेने केला आरडा ओरडा केला. मात्र मदत मिळाली नाही. मदत न मिळाल्याने चालत्या रिक्षातूनच महिलेने उडी मारली, असं सांगितलं जातंय. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करत पोलिसांनी आरोपी प्रवासी आणि रिक्षा चालकाला अटकही केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com