Pune Crime News : फोटो व्हायरल करायची धमकी देत मुलीवर अत्याचार; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune News : तरुणाने मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून दोघांचे बोलणे व्हायचे. या दरम्यात तरुणाने मुलीला भेटण्यास बोलावले
Pune Crime News
Pune Crime NewsSaam tv

सचिन जाधव 

पुणे : सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर दोघांचे भेटणे झाले. यात मुलीसोबत फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याची (Pune) धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या लोणीकंद परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

Pune Crime News
Mahuli Fort : ट्रेकिंग करताना पाय घसरून खोल दरीत कोसळला; माहुली गडावरील घटना, तरुण गंभीर जखमी

पुण्यातील हि घटना असून या घटनेतील संशयित आरोपी व पीडित मुलगी दोघेही शिक्षण घेतात. त्या दोघांची ओळख इंस्टाग्रामवर झाली. यानंतर तरुणाने मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून (Crime News) दोघांचे बोलणे व्हायचे. या दरम्यात तरुणाने मुलीला भेटण्यास बोलावले. यात संधीचा फायदा घेत तिचे फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

Pune Crime News
Bhandara News : वाळू माफियाकडून मागितली २० हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या ताब्यात

हा धक्कादायक प्रकार लोणीकंद परिसरात ७ मार्च ते ४ एप्रिल या दरम्यान घडला. याच दरम्यान तरुणाने ४ एप्रिलला पीडित तरुणीला जबरदस्तीने त्याच्या कारमध्ये बसवून खराडी भागातील आयटी पार्क येथील मोकळ्या मैदानात नेले. त्याठिकाणी गाडीमध्ये (Police) तिच्यासोबत असभ्य वर्तन करुन तिचे अश्लील फोटो काढले. यानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून अभि कांबळे याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत. दरम्यान लोणीकंद पोलीस ठाणे अंतर्गत १५ दिवसात तीन पोक्सो गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com