Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांनाे! पाणी जपून वापरा, जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती
Water Crisis In Pune: 7 54 Tmc Water Left In Khadakwasla DamSaam Digital

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांनाे! पाणी जपून वापरा, जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

Khadakwasla Dam Water Level Today In Marathi: गतवर्षीच्या तुलनेत खडकवासला साखळीत कमी पाणी असल्याने आगामी काळात पाण्याच्या बचतीवर भर दिला जाणार आहे. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी केले.

- अक्षय बडवे

विदर्भ मराठवाडा भागात भीषण पाणीटंचाईचे चित्र असतानाच आता पुण्याला देखील टंचाईच्या झळा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्राथमिक माहितीनूसार खडकवासला धरण साखळीत 7.54 टीएमसी म्हणजे फक्त 25.88 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी पुढच्या काही दिवसांत पुणेकरांना पाणी कपातीचे संकटाला सामाेरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांनाे! पाणी जपून वापरा, जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती
Varandha Ghat Road Closed : वरंधा घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे शहर तसेच इंदापूर, दौंड, हवेली या तालुक्यांना पाण्यासाठी खडकवासला धरणाचा आधार आहे. यंदा उन्हाची तीव्रता वाढल्याने गेल्यावर्षी पेक्षा पाणीसाठा अल्प प्रमाणात शिल्लक राहिला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

सध्या खडकवासला धरण साखळीत 7.54 टीएमसी म्हणजे फक्त 25.88 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी धरणसाखळीत 10.34 टीएमसी म्हणजे 35.46 टक्के पाणीसाठा होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गतवर्षीच्या तुलनेत खडकवासला साखळीत कमी पाणी असल्याने आगामी काळात पाण्याच्या बचतीवर भर दिला जाणार आहे. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांनाे! पाणी जपून वापरा, जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती
Reels साठी पोरांनी महागड्या कार चोरल्या, सोशल मीडियावर घालायचा होता धुमाकूळ, आता बेड्या पडल्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com