Reels साठी पोरांनी महागड्या कार चोरल्या, सोशल मीडियावर घालायचा होता धुमाकूळ, आता बेड्या पडल्या

कारच्या शोरूमचे जनरल मॅनेजर सागर कड यांच्या सतर्कतेमुळे कार चाेरीचे हे प्रकरण उघडकीस आले. सुरुवातीला एका गाडी आणि पाठोपाठ 2 गाड्या पाच मित्रांनी चोरल्याचे उघड झाले.
youth and 4 minors arrested in car theft case near akola
youth and 4 minors arrested in car theft case near akola Saam Digital

- अक्षय गवळी

सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी अकोल्यात काही शाळकरी मित्रांनी एक वेगळा फंडा केला खरा पण ताे त्यांच्या चांगलाच अंगलट आला. रिल्स बनवण्यासोबतच फक्त मौज-मजेसाठी 4 अल्पवयीन मुलांसह एका युवकाने चोरीचा मार्ग निवडला. या पाच जणांनी थेट अकोल्यातल्या एमआयडीसी भागातील एका कारच्या शोरुमवर डल्ला मारत चक्क महागड्या 3 कार चोरल्या. दरम्यान पाेलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती पोलिस अधिक्षक बच्चनसिंग यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

सर्व सशंयित चाेरट्यांनी कार चाेरल्यानंतर या कारसह ते महार्गावर व्हिडिओ शूट करत हाेते. त्यावेळी 120 पेक्षा जास्त वेगानं वाहन चालवत असताना त्याचं हे बिंग फुटलं. विशेष म्हणजे कार चोरणारे सर्व अल्पवयीन मुले चांगल्या कुटुंबातील आहेत. नामांकित शाळेत शिक्षण घेताहेत. मात्र, इतर मित्रांवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी त्यांनी केलेले चुकीचे धाडस त्यांच्या अंगलट आले.

youth and 4 minors arrested in car theft case near akola
Beed Constituency: पंकजा मुंडे, बजरंग सोनवणेंना नोटीस, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 48 तासांमध्ये मागवला खुलासा; जाणून घ्या कारण

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या प्रकरणी मिर्झा उबेद बेदमिर्जा सईद बेग या युवकासह चाैघा अल्पवयीन मुलांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 70 लाखांहुन अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

youth and 4 minors arrested in car theft case near akola
व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com