Mahuli Fort : ट्रेकिंग करताना पाय घसरून खोल दरीत कोसळला; माहुली गडावरील घटना, तरुण गंभीर जखमी

Shahapur News : शहापूर तालुक्यातील माहुली गडावर शिल्प व इतर ऐतिहासिक वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी नांदेड येथून आलेले कपिल कसबे व सिद्धार्थ हे काही दिवस माहुली गडावर थांबले होते
Mahuli Fort
Mahuli FortSaam tv

फय्याज शेख 

शहापूर : शहापूर तालुक्यातील माहुली गडावर ट्रेकिंगच्या निमित्ताने दोन जण आले होते. दरम्यान ८ एप्रिलला ट्रेकिंग करत असताना एकाचा (Shahapur) पाय घसरल्याने खोल दरीत कोसळला. ही माहिती जीरक्षक टीमला कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्या ट्रेकरला बाहेर काढले असून तो गंभीर जखमी झाला आहे. 

Mahuli Fort
Wardha Crime News : नवऱ्याला मध्यरात्रीच संपवलं; बायकोनं बनाव रचला, रिपोर्ट आला अन् बिंग फुटलं!

शहापूर तालुक्यातील माहुली गडावर शिल्प व इतर ऐतिहासिक वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी नांदेड येथून आलेले कपिल कसबे व सिद्धार्थ हे काही दिवस माहुली गडावर थांबले होते. यानंतर हे दोघे ८ एप्रिलला (Trekking) गडावरील कल्याण दरवाजाकडून भटोबा सुळक्याकडे जात असताना कपिलचा पाय घसरल्याने तो दरीत कोसळला होता. याबाबतची माहिती सिद्धार्थने दिल्याने जीवरक्षक टिमच्या सदस्यांनी तात्काळ माहूली गडावर जाऊन संध्याकाळपासून शोधमोहीम सुरू केली. 

Mahuli Fort
Water Crisis : अमरावती जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; मेळघाट परिसरात तीन दिवसांनी येतेय टँकर

रात्रभर शोधमोहीम सुरू ठेवली होती. दरम्यान आज सकाळी कपिल हा जबर जखमी अवस्थेत आढळून आला असून कपीलला झिपलाइन तंत्राच्या सहाय्याने खाली आणले. यानंतर त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com