Wife Killed Husband
Wife Killed HusbandYandex

Wardha Crime News : नवऱ्याला मध्यरात्रीच संपवलं; बायकोनं बनाव रचला, रिपोर्ट आला अन् बिंग फुटलं!

Wife Killed Husband In Nagthana: दारूच्या नशेत पती नेहमी घालायचा वाद. अखेर कंटाळलेल्या बायकोने नवऱ्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिने नवऱ्याच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचं समोर आलं आहे.

चेतन व्यास, साम टीव्ही वर्धा

दारूच्या नशेत पती नेहमी घालायचा वाद. अखेर कंटाळलेल्या बायकोने नवऱ्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिने नवऱ्याच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचं समोर आलं आहे. पोलीस तपासात मात्र बिंग फुटलं अन् पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या (Wardha Crime News) ठोकल्या. तसंच याप्रकरणी संशयितांनाही ताब्यात घेतलं आहे. नागठाणा येते ही खळबळजनक घटना घडली आहे.

दारूच्या नशेत नवरा नेहमी वाद घालत बायको आणि मुलाला मारहाण करायचा. अखेर संतापलेल्या पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केली. सुरवातीला पोलिसांची दिशाभूल करत नवऱ्याने आत्महत्या केल्याचा बनाव बायकोने केला. मात्र, पोलीस तपासात हे बिंग फुटले आहे.दारूच्या नशेत होत असलेल्या घरगुती कलहातून झालेल्या वादात नवऱ्याची गळा आवळून हत्या करण्यात आली.

याप्रकरणी सावंगी पोलिसांनी शवविच्छेदन अहवालावरुन हत्येचा गुन्हा दाखल करीत आरोपी पत्नीस अटक करुन इतर तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. गणेश हरिभाऊ भलावी (४० रा. नागठाणा) असं मृतकाचे नाव आहे. तर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये मृतकाची पत्नी सुनीता गणेश भलावी हिचा समावेश असल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली आहे.

गणेश भलावी हा मजुरी काम करायचा. दररोजप्रमाणे तो ७ मे रोजीही घरुन सकाळी मजुरी कामासाठी निघाला (Wife Killed Husband) होता. रात्री उशिरा घरी आला. त्याने पोटभर जेवणही केलं. मात्र, नेहमी दारूच्या नशेत वाद घालणाऱ्या गणेशने मध्यरात्री पत्नी सुनिताशी वाद घातला. वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. अखेर नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या सुनिताने रागाच्या भारात गणेशचा हाताने गळा आवळून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी नागठाणा परिसर गाठून पंचनामा केला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथक पाचारण करण्यात आलं होतं. याप्रकरणी ८ रोजी रात्री हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Wife Killed Husband
Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

आरोपी पत्नी सुनिताने पती गणेशची हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेतल्याचा बनाव केला. त्याच्या गळ्यात ओढणी बांधून ठेवत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न (Nagthana) केला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना काही बाबी संशयास्पद वाटल्या. अखेर पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या आरोपी पत्नीनेच हत्या केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे तिला बेड्या ठोकल्या.

घटनेवेळी घरात केवळ पती अन् पत्नीच हजर असल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. सुरूवातीला पत्नीच्या जबाबावरून आकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. बुधवारी मृतदेहाचा तात्पुरता शवविच्छेदन अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देताच गणेशची गळा आवळून हत्या (killed) केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांची दिशा स्पष्ट झाली. त्यांनी तात्काळ आरोपी पत्नीस ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.

Wife Killed Husband
Mumbai Crime News: धावत्या रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग; घाबरून मारली रस्त्यावर उडी, मुंबईतील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com