Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

Nagpur Crime : पत्नीने जेवणात थंड भात दिल्याने संतपालेल्या पतीने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान नागपूरमधील पोलीस स्टेशन पाचपावलीचे बीट मार्शलमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीचा जीव वाचवला. नेमकं काय आहे प्रकरण ते जाणून घेऊया.
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam TV

नागपूर: येथील लष्करी भागात विचित्र घटना घडल्याचं समोर आलंय. पत्नीने थंड भात खायला दिल्याने संतापलेल्या पतीने स्वत:ला गळफास लावत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संतप्त झालेल्या पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचं पाहताच घाबरलेल्या पत्नीने पोलिसांना कॉल केला. नागपूरमधील तत्पर पाचपावली पोलिसांच्या बिट मार्शलने या पत्नीच्या नवऱ्याचा जीव वाचवलाय.

गुन्हा घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी येतात, अशी टीका नेहमीच पोलिसांवर केली जाते. पण नागपूरातील लष्करी भागात कार्यतत्पर असलेल्या बिट मार्शल वेळेत पोहोचत या व्यक्तीचा जीव वाचवला. बीट मार्शलने बजावलेल्या कर्तव्यावर खूश होत पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पोलीस कर्मचारी अतुल फरताडे, देवेंद्र शर्मा आणि लांडे आणि मनोज चौधरी यांचा सत्कार केलाय.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, भोलानाथ असं त्या जीव वाचलेल्या व्यक्तीचं नाव आहे. लष्करी भागात भोलानाथ यांचे कुटुंब राहत होतं. भोलानाथ यांच्या पत्नीने त्यांना थंड जेवण दिल्याने भोलानाथ संतापले आणि त्यांनी बायको आणि मुलाला मारहाण केली. त्यानंतर पत्नी आणि मुलाला घराच्या बाहेर काढत आतून दार लावून घेतलं. मी जीव देत आहे, अशी धमकी तो आतून देत राहिला. त्यानंतर घाबरलेल्या पत्नीने ११२ नंबरवर कॉल करत पोलिसांना मदत मागितली. त्यानंतर पाचपावली पोलिसांच्या बिट मार्शलने गंभीरता लक्षात घेत लष्करी बाग परिसरात दाखल झाले.

बिट मार्शल यांनी संवेदनशीलता दाखवत सुरूवातीला भोलानाथ याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण भोलानाथ कोणाचं ऐकत नव्हता. शेवटी मार्शलने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी दरवाजा तोडून घरात शिरण्याचा निर्णय घेतला. त्यादरम्यान भोलानाथ हा घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास लावण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पोलीस कर्मचारी अतुल फरताडे, देवेंद्र शर्मा आणि लांडे आणि मनोज चौधरीने घरात प्रवेश केला. त्यानंतर भोलानाथचे पाय पकडत त्याला वर उचलून धरले. दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी भोलानाथच्या गळ्यातील गळफास सोडवला.

बीट मार्शल यांनी दाखवलेला प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळलीय. दरम्यान भोलानाथला दारूचे व्यसन आहे. दारू प्यायल्यानंतर तो मुलांना आणि पत्नीला मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी पत्नीने जेवणात वाढलेल्या ताटात भात थंड आहे. या करणावरून त्यांनी पत्नीशी भांडण केले. त्यानंतर गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बीट मार्शल वेळेत पोहोचल्याने भोलानाथचा जीव वाचला. पोलीस विभागाचे प्रतिमा उंचावण्यात नक्कीच मदत झाली.

या चांगल्या कामगिरीबाबत पोलीस स्टेशन पाचपावलीचे बीट मार्शल अतुल, मनोज, देवेंद्र आणि प्रफुल यांचे कार्याची पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दखल घेतली. पाचपावली पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आलं.

Nagpur Crime News
Crime News: मॅट्रिमोनिअल साइट्सवर ओळख; ७ महिलांशी लग्न आणि तिघींवर अत्याचार, शिक्षिकेमुळे पितळ उघडं पडलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com