Crime News: मॅट्रिमोनिअल साइट्सवर ओळख; ७ महिलांशी लग्न आणि तिघींवर अत्याचार, शिक्षिकेमुळे पितळ उघडं पडलं

Matrimonial Fraud: मॅट्रिमोनिअल साइट्सद्वारे एका ४२ वर्षीय व्यक्तीने व्यक्तीने बाराहून अधिक महिलांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
महिलांची फसवणूक
Crime NewsYandex
Published On

मॅट्रिमोनिअल साइट्सद्वारे एका ४२ वर्षीय व्यक्तीने व्यक्तीने बाराहून अधिक महिलांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी या व्यक्तीला अटक देखील केलं गेलं. त्याने आतापर्यंत सात महिलांशी लग्न केलं आहे. तर तिन महिलांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार (Crime News)केल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

इमरान अली खान नावाच्या या आरोपीला मागील आठवड्यात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पायधोनी भागातील एका ४२ वर्षीय शिक्षिकेला मॅट्रिमोनिअल साइट्सवर भेटला (Physically Abused) होता. त्याने तिला लग्नाचं आश्वासन देऊन २२ लाख रूपयांना फसवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीली अटक केली आहे.

पीडित महिलेला तिच्या वयामुळे लग्न करता येणार नाही, हे आरोपीच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने या महिलेला फसवल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पीडितेला लग्न करण्याचे वचन देऊन त्याने मुंबईतील भायखळा येथे फ्लॅट विकत घेण्याच्या बहाण्याने तिच्याकडून अनेक वेळा पैसे घेतलं, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपी सात दिवस पोलीस कोठडीत (Matrimonial Fraud) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपीने फसवणुकीच्या उद्देशाने आतापर्यंत सात महिलांशी लग्न केलं आहे. यामध्ये परभणी, सोलापूर आणि पश्चिम बंगालमधील महिलांचा समावेश आहे. आरोपी एका विशिष्ट समाजातील घटस्फोटित महिलांचा वैवाहिक साइटवर शोध घेतो. तो दुसऱ्या लग्नाच्या विचारात असलेल्या महिलांशी मैत्री करायचा. त्यांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये (Mumbai Breaking) बोलवायचा.

महिलांची फसवणूक
Shahid Kapoor On Physical Abuse: धक्कादायक! लहानपणीच शाहीद कपूरचं झालंय फिजिकल अब्युज, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

सुखी जिवनाचं स्वप्न दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत होता. या पैशातून तो जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही पद्धत वापरून त्याने मुंबईतील किमान सात महिलांची फसवणूक आतापर्यंत केली आहे. मुंबई व्यतिरिक्त, त्याने परभणी, धुळे, सोलापूर, मसुरी, कोलकाता, लखनौ आणि दिल्ली येथेही महिलांची फसवणूक केल्याचा आरोप आहे, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

महिलांची फसवणूक
Physically Abused Case: महिलेकडून खोट्या अत्याचाराचा आरोप; कोर्टाने सुनावली ४ वर्षांची शिक्षा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com