Physically Abused Case
Physically Abused CaseYandex

Physically Abused Case: महिलेकडून खोट्या अत्याचाराचा आरोप; कोर्टाने सुनावली ४ वर्षांची शिक्षा

False Allegation Of Physically Abused: बरेलीमध्ये एका महिलेने तिच्या मुलीवर अत्याचार झाल्याचा खोटा आरोप केला होता. याप्रकरणी सत्य समोर आल्यानंतर न्यायालयाने या महिलेला निर्दोष व्यक्तीने भोगलेल्या शिक्षेइतकीच शिक्षा आणि दंड सुनावला आहे.

बरेलीमध्ये एका महिलेने तिच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा खोटा आरोप (Physically Abused Case) केला होता. त्यामुळे निर्दोष व्यक्तीला तुरुंगवास भोगावा लागला. याप्रकरणी पर्दाफाश झाल्यानंतर न्यायालयाने आता दोषी महिलेला निर्दोष व्यक्तीन भोगलेल्या शिक्षेइतकीच शिक्षा आणि दंड देखील सुनावला आहे. बलात्काराच्या खोट्या खटल्यात एका निर्दोष व्यक्तीने ४ वर्षे ६ महिने तुरुंगावास भोगला होता.

न्यायाधीश निशोद कुमार यांच्या न्यायालयात या बलात्कार प्रकरणाची सुनावणी सुरू होती. पोलीस अधिकाऱ्यांनी लाईव्ह हिंदुस्थानला दिलेल्या माहितीनुसार, या तरूणीच्या आईने २ सप्टेंबर २०१९ रोजी बारादरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. बरेली येथील रहिवासी अजय आणि तिची मुलगी एकत्र काम करत होते. २९ ऑगस्ट २०१९ रोजी अजय तिच्या मुलीला घेऊन (False Allegation Of Physically Abused) गेला, असा आरोप या महिलेने केला होता.

त्यानंतर बारादरी पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तरूणाला ताब्यात घेतलं होतं. या तरुणीने तिच्या लेखी निवेदनात अजयने तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर अजयची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. अजून त्याला जामीनही मंजूर झालेला नाही.

न्यायाधीश निशोद कुमार यांच्या न्यायालयात बलात्कार प्रकरणाची सुनावणी सुरू होती. नंतर तरूणीने तिचे म्हणणे पूर्णपणे मागे घेतले. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी उलटतपासणी (court news) झाली. त्यादरम्यान या तरूणीने तिचे म्हणणे मागे घेतले आहे. ती म्हणाली, मी अशिक्षित आहे. मला लिहिता-वाचता येत नाही. परंतु या तरूणीने लिखित निवेदनावर इंग्रजीत सही केली होती. अजयने तिच्यावर बलात्कार केला नसल्याचं तिने सांगितलं. पोलिसांच्या दबावाखाली लेखी निवेदन दिल्याची माहिती तिने दिली होती.

Physically Abused Case
Supreme Court On Sandeshkhali Case : संदेशखाली प्रकरणी CBI चौकशी सुरूच राहणार; SC कडून बंगाल सरकारला झटका

यानंतर न्यायाधीश निर्दोष कुमार यांनी या तरूणीला न्यायालयीन कोठडीत घेण्याचे आणि खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. विनोद (Physically Abused Imprisonment) बिहारी माथूर यांनी या तरूणीवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी न्यायालयाने अजयची निर्दोष मुक्तता केली. या तरूणीला चार वर्षे सहा महिने आठ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. तसंच अजयच्या तुरुंगात राहण्याच्या कालावधीसाठी ५ लाख ८८ हजार ८२२ रूपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.

Physically Abused Case
Mumbai Court Raps Ed: खटल्याला उशीर झाला, आरोपींनी अधिकची शिक्षा भोगली, ईडीला कोर्टाने फटकारलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com