Viral Video : सलाम तुझ्या जिद्दिला! Zomato डिलिव्हरी बॉय बाइकवर करतोय UPSC चा अभ्यास, पाहा व्हिडिओ

Zomato Boy Viral Video : अनेक तरुण मोठ्या संघर्षावर मात करत अडचणींशी दोन हात करतात. संघर्ष करत अभ्यास करत असलेल्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
Zomato Boy Viral Video
Zomato Boy Viral VideoSaam TV

Zomato Boy Preparation UPSC :

प्रत्येक तरुण आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी, नोकरीसाठी धडपड करत असतो. सरकारी नोकरीसाठी लाखो तरुण दरवर्षी UPSC आणि MPSC चा अभ्यास करतात. मात्र या दोन्ही परीक्षा पास करणे वाटते तितके सोपे नाही. अनेक तरुण मोठ्या संघर्षावर मात करत अडचणींशी दोन हात करतात. संघर्ष करत अभ्यास करत असलेल्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Zomato Boy Viral Video
Viral Video : कलिंगडाच्या बिया काढण्यासाठी सिंपल ट्रिक्स; देसी जुगाड सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन जात आहे. दुचाकीवरून जात असताना तो सिग्नलला थांबतो. सिग्नलवर उगच वेळ घालवण्यापेक्षा तो तिथेच ऑनलाइन लेक्चर अटेंड करतो. ऑनलाइन लेक्चरमध्ये शिकवलेल्या गोष्टी तो अशा परिस्थितीत शिकून घेत आहे. या तरुणाच्या जिद्दीला आणि चिकाटीला खरोखरच सलाम.

सोशल मीडियावर @Ayusshsanghi या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, हार्ड वर्क आणि स्टडीसाठी हा तरुणाचा व्हिडिओ खरोखर प्रेरणादायी आहे.

सरकारी नोकरी किंवा अन्य भरतीसाठी बरेच तरुण अभ्यास करतात. अभ्यासात मन लागत नाही त्यामुळे मोटीवेशनसाठी विविध व्हिडिओ किंवा वेगळे लेक्चर अटेंड करतात. काही तरुणांवर घरची जबाबदारी असते. पैसे कमवणे गरजेचं असतं. त्यामुळे त्यांना अभ्यास करण्यास वेळ मिळत नाही. परिणामी काही तरुण काम करताकरता अशा पद्धतीने अभ्यास करतात.

झोमॅटो बॉयचा अभ्यास करतानाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत जवळपास ६६ हजारांहून अधिक व्यक्तींनी हा व्हिडीओ पाहिलाय. तसेच यावर कमेंटही केल्यात. एका नेटकऱ्याने यावर कमेंटमध्ये लिहिलंय की, जबाबदारी माणसाला पुढे घेऊन जाते. संघर्ष केल्यास यश नक्की मिळतं, अशा कमेंट देखील काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लिहिल्यात.

Zomato Boy Viral Video
Mayank Yadav Fastest Ball: वेगाचा नवा बादशहा! मयांकने पदार्पणातच टाकला 155.8 kmph गतीचा चेंडू- VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com