Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Video : कलिंगडाच्या बिया काढण्यासाठी सिंपल ट्रिक्स; देसी जुगाड सोशल मीडियावर व्हायरल

Viral Video : खरंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अशा पद्धतीने कलिंगड खाताना बिया बाजूला काढण्यासाठी समस्या निर्माण होतात. चमचा किंवा अगदी हाताने देखीव बिया काढताना कलिंगड तुटून जातं.
Published on

Watermelon Video :

राज्यात सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढला आहे. अशात बाजारात अनेक ठिकाणी कलिंगड विक्रीसाठी आले आहेत. कलिंगड थंड असल्याने सर्वजण उन्हाळ्यात यावर ताव मारतात. तुम्ही देखील उन्हाळ्यात कलिंगड खात असाल. कलिंगड आवडीने आणि चवीचवीने खाताना त्यातील बिया दाताखाली येतात. किंवा त्या काढताना बराच वेळ जातो. त्यामुळे आज कलिंगडाच्या बिया काढण्याच्या सिंपल टिप्स जाणून घेऊ.

Viral Video
Viral Video: कहरच! टार्गेट पूर्ण करण्यासाठी बॉसने दिली अनोखी शपथ; व्हिडिओ तुफान व्हायरल

सोशल मीडियावर @misscrafty20 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये कलिंगडच्या बिया कशा काढल्या जातात याची सिंपल ट्रिक दिली आहे. सुरुवातीला कलिंगडाचा पुढचा आणि मागचा भाग थोडा कापून घ्यावा. त्यानंतप कलिंगड अगदी मधोमध कापून घ्यावे.

कलिंगड मधोमध कापल्यावर गोलाकारामध्ये त्याचे बारीक काप करून घ्यावे. असे केल्याने कलिंगडामधील ज्या ठिकाणी बिया असतात ती जागा दिसते. त्यानंतर बिया असलेल्या ठिकाणी कट केल्यावर तुम्हाला अगदी सहज त्यामधील बिया काढता येतात.

खरंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अशा पद्धतीने कलिंगड खाताना बिया बाजूला काढण्यासाठी समस्या निर्माण होतात. चमचा किंवा अगदी हाताने देखीव बिया काढताना कलिंगड तुटून जातं. त्यामुळे ही ट्रिक तशी अनेकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

मात्र या व्हिडिओवर अनेकांनी निगेटीव्ह कमेंट देखील केल्या आहेत. अजून यातील बिया पडल्याच नाहीत. अशा कमेंट काहींनी केल्यात तर एकाने कलिंगडातील बिया लहान मुलांसाठी चांगल्या देखील असतात असंही लिहिलं आहे.

Viral Video
Viral Video: भररस्त्यात बाईकवर स्टंटबाजी करणं चांगलंच भोवलं! पाठीमागून पोलीस आले अन् घडवली अद्दल, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com