Viral Video: कहरच! टार्गेट पूर्ण करण्यासाठी बॉसने दिली अनोखी शपथ; व्हिडिओ तुफान व्हायरल

Manager Employees Oath Viral Video: ऑफिसमध्ये प्रत्येकाचा बॉस कर्मचाऱ्यांकडून टार्गेट पुर्ण करुन घेण्यासाठी कधी रागावतात कधी प्रेमाने सांगतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Manager Employees Oath Viral Video:
Manager Employees Oath Viral Video: Saamtv
Published On

Viral Video News:

सध्या स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, जगाच्या दोन पाऊल पुढे राहावे लागते. आयटी कंपनींमध्ये काम करणारे तरुण- तरुणींनाही बारा- बारा तास काम करावे लागते. ऑफिसमध्ये प्रत्येकाचा बॉस कर्मचाऱ्यांकडून टार्गेट पुर्ण करुन घेण्यासाठी कधी रागावतात कधी प्रेमाने सांगतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऑफिसच्या बॉसने चक्क शपथ दिल्याचे दिसत आहे.

प्रत्येकाचे ऑफिस कल्चर वेगळे असते. काहींना टार्गेट पुर्ण करण्याचा दबाव असतो तर काहींना नसतो. अनेकदा टार्गेट पुर्ण करण्यासाठी बॉस नेहमी हात धुऊन मागे लागलेले असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका बॉसचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बॉसने चक्क शपथ दिल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये (Viral Video) बॉस आपल्या कर्मचाऱ्यांना टार्गेट साध्य करण्यासाठी प्रेरित करत असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर ते टार्गेट पुर्ण करण्याचा मार्गही सांगत आहे. तसेच ते आपल्या कर्मचाऱ्यांना टार्गेट पुर्ण करण्यासाठी शपथ देत आहेत. यामध्ये बॉसच्या पाठीमागे सर्व कर्मचारी "आम्ही शपथ घेतो की आम्ही मार्च महिन्याचे टार्गेट 110% साध्य करू. यासाठी आम्ही आमची पूर्ण ताकद देऊ, असे म्हणताना दिसत आहेत.

Manager Employees Oath Viral Video:
नितेश राणेंनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये; बच्चू कडू असं का म्हणाले?

दरम्यान, Instagram marketingmotivation नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये अनेकांनी कर्मचाऱ्यांची दया येते असे म्हटले आहे. तर काही जणांनी कोणी टार्गेट पुर्ण करणार नाही, असाही दावा केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


Manager Employees Oath Viral Video:
Dhule Crime News : मध्य प्रदेशातून मुंबईत येत होती कार, धुळे पोलिसांना फक्त संशय आला, धक्कादायक बाब आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com