Dhule Crime News : मध्य प्रदेशातून मुंबईत येत होती कार, धुळे पोलिसांना फक्त संशय आला, धक्कादायक बाब आली समोर

dhule News : धुळे शहर पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार चारचाकी वाहनातून मध्य प्रदेश येथून काही इसम अवैधपणे गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली
Dhule News
Dhule News Saam tv

धुळे : गांजाची लागवड व वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाया सुरूच आहेत. अशात धुळे पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. (Dhule) चारचाकी वाहनातून गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांच्या धुळे शहर पोलिसांनी (Police) लाखो रुपयांच्या गांजासह मुद्देमालासकट ताब्यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

Dhule News
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथक तैनात

धुळे शहर पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार चारचाकी वाहनातून मध्य प्रदेश येथून काही इसम अवैधपणे गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे धुळे शहर पोलिसांनी (Dhule Police) सापळा रचत मध्य प्रदेशकडून (Madhya Pradesh) मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीची तपासणी केली. यात गांजा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule News
Lok Sabha Election : जालन्यातून जरांगे पाटलांनीच निवडणूक लढावी; मराठा समाजाच्या बैठकीत ठराव

गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी २१ किलो गांजा हस्तगत केला आहे. ज्याची बाजारामध्ये दोन लाख तेरा हजार रुपये इतकी किंमत मानली जात आहे. यासह या संपूर्ण कारवाईमध्ये पोलिसांनी सहा लाखाहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धुळे शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com