Pimpri Chinchwad Accident : पुणे-बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

police personnel dies in Accident : ज राज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघाताची घटना घडली. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही अपघाताची घटना घडली.
Pimpri Chinchwad Accident
Pimpri Chinchwad Accident Saam tv

पिंपरी-चिंचवड : आज राज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघाताची घटना घडली. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात एक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घडली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून ही दुर्देवी घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघाताची भीषण घटना घडली. पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुणे-बेंगळुरु महामार्गावर पोलीस शिपायाच्या अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Pimpri Chinchwad Accident
Accident News: वाऱ्याच्या वेगाने रिक्षा पळवली, ताबा सुटताच क्रेनला धडक; ७ जणांचा जागीच अंत

मिळालेल्या माहितीनुसार, रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सचिन नरुटे या पोलील कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. ते वाहतूक पोलीस कर्मचारी होते. देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सचिन नरुटे ऑन ड्युटी रात्री १०.३० च्या सुमारास पुनावळ्यावरून देहूरोडच्या दिशेने जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे. या अपघात प्रकरणी रावेत पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Pimpri Chinchwad Accident
Bus Accident: चालकाला डुलकी लागली अन् घात झाला; प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उड्डाणपुलावरून कोसळली; भयानक VIDEO

नाशिकमध्ये भीषण अपघात

नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावजवळ भीषण अपघात झाला. मालेगावजवळ मुंगसेजवळ एसटी बसने दुचाकीने धडक दिली. नातींना शाळेत सोडवण्यासाठी जाणाऱ्या आजोबांची दुचाकी एसटी बसला धडकली. या अपघातात आजोबासह एक शाळेत जाणाऱ्या नातीचा मृत्यू झाला. तर दुसरी नात गंभीर जखमी आहे. या अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com