Accident News: वाऱ्याच्या वेगाने रिक्षा पळवली, ताबा सुटताच क्रेनला धडक; ७ जणांचा जागीच अंत

Bihar Accident News: वाहतुकीते नियम धाब्यावर ठेवून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरुन रिक्षाचालक अत्यंत सुसाट वेगाने रिक्षा चालवतात. त्यामुळे काही वेळा अपघातांच्या मोठ्या घटना देखील घडतात.
Bihar Rickshaw Crane Accident News
Bihar Rickshaw Crane Accident News Saam TV

Bihar Rickshaw Crane Accident News

वाहतुकीते नियम धाब्यावर ठेवून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरुन रिक्षाचालक अत्यंत सुसाट वेगाने रिक्षा चालवतात. त्यामुळे काही वेळा अपघातांच्या मोठ्या घटना देखील घडतात. बिहारची राजधानी पाटण्यात मंगळवारी (ता. १६) सकाळी अशाच प्रकारची भयानक घटना घडली. भाडे मिळवण्यासाठी रिक्षाचालकाने सुसाट वेगाने रिक्षा चालवली.  (Breaking Marathi News)

Bihar Rickshaw Crane Accident News
Bus Accident: चालकाला डुलकी लागली अन् घात झाला; प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उड्डाणपुलावरून कोसळली; भयानक VIDEO

पण, त्याचवेळी रिक्षाचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. क्षणार्धात रिक्षा रस्त्याच्या कडेला काम करीत असलेल्या क्रेनला जाऊन धडकली. अपघात (Accident) इतका भीषण होता, की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत तब्बल ७ प्रवाशांचा जागीच जीव गेला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या भीषण दुर्घटनेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटनामधील कंकरबाग परिसरातून प्रवाशांना घेऊन रिक्षाचालक रामलखान पथकडे निघाला होता.

त्याचवेळी रस्त्याच्या कडेला एक क्रेन मेट्रोचे लाईनसाठी काम करीत होता. भरधाव वेगात असलेल्या रिक्षाचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. क्षणार्धात रिक्षा अनियंत्रित होऊन क्रेनला जाऊन धडकली. या घटनेत रिक्षामधील ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

तर ३ प्रवाशांनी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राण सोडले. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही. सध्या रिक्षाचालकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Bihar Rickshaw Crane Accident News
Jhelum River: झेलम नदीत बोट बुडाली, अनेक शाळकरी विद्यार्थी बेपत्ता; थरारक घटनेचा VIDEO समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com