जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये मंगळवारी (ता. १६) मोठी दुर्घटना घडली. श्रीनगरच्या बटवाराजवळ झेलम नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली. या घटनेत काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक विद्यार्थी बेपत्ता असल्याचं कळतंय. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने बचावकार्य सुरू केलंय. आतापर्यंत १२ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. (Breaking Marathi News)
गेल्या ७२ तासांपासून काश्मीर खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे झेलम नदीला पूर मोठा पूर आला आहे. अशातच शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन एक बोट गांदरबलहून बटवारा येथे जात होती. पाण्याच्या प्रवाहामुळे अचानक बोट उलटली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोटीवर डझनभर शाळकरी विद्यार्थ्यांसह काही स्थानिक नागरिक होते.
या दुर्घटनेत काही विद्यार्थी बेपत्ता असून त्यांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. आतापर्यंत १२ जणांना बाहेर काढण्यास बचावपथकाला यश आलं आहे. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मागील आठवडाभरापासून जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सुरूच आहे. सततच्या पावसामुळे झेलमसह अनेक जलकुंभांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडल्यामुळे वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. येत्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्येही अशीच स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
झेलम नदीबद्दल बोलायचे झाल्यास, ती प्रामुख्याने उत्तर-पश्चिम भारत तसेच उत्तर आणि पूर्व पाकिस्तानची नदी मानली जाते. पंजाब प्रदेशातील पाच नद्यांपैकी झेलम ही पश्चिमेकडील नदी आहे. ती पूर्व पाकिस्तानातील सिंधू नदीला मिळते. ही एक नदी आहे जी काश्मीरच्या खोऱ्यांना अधिक सुंदर बनवते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.