Ashok Saraf New Movie : अशोक मामा 'वेड'नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार, 'लाईफ लाईन' मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Life Line Marathi Movie : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर राहिलेल्या अशोक सराफ यांचा लवकरच एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Life Line Marathi Movie Poster
Ashok Saraf New Movie PosterInstagram

महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीमध्ये विशेष छाप सोडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर राहिलेल्या अशोक सराफ यांचा लवकरच एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Life Line Marathi Movie Poster
Baby John Released Date : 'बेबी जॉन'ची रिलीज डेट ठरली, वरुण धवन डिसेंबरमध्ये गाजवणार बिग स्क्रिन

अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत 'रात्रीस खेळ चाले' फेम अण्णा नाईक अर्थात माधव अभ्यंकर हे सुद्धा स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव 'लाईफ लाईन' असं असून आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, महानायक अशोक सराफ आणि आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने घराघरांत पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर दिसत आहे. अशोक सराफ यांच्या गळ्यातील स्टेथोस्कोप आणि माधव अभ्यंकर यांच्या गळ्यातील तुळशीमाळ यावरून या दोघांमधील मतभेदाचा अंदाज प्रेक्षकांना येऊ शकतो. मात्र हा मतभेद कोणत्या कारणावरून आहे, या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

Life Line Marathi Movie Poster
OTT Releases This Week : OTT वर ‘या’ आठवड्यात मिळणार रोमान्स, क्राईम आणि सस्पेन्ससह मनोरंजनाचा भारी डोस, एकदा लिस्ट बघाच...

अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यासह चित्रपटात मुख्य भूमिकेत हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

साहिल शिरवईकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंटने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

राजेश शिरवईकर यांची कथा, पटकथा, संवाद आणि गीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली असून या भावपूर्ण गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर ह्यांचा आवाज लाभला आहे. 'लाईफ लाईन' हा चित्रपट ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी आहे.

Life Line Marathi Movie Poster
Vaastav Marathi Remake : " 'वास्तव'चा मराठी रिमेक आला तर कोणत्या कलाकारांना घेणार ?"; दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी दिली हिंट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com