Madness Machayenge Show : हेमांगी कवी, कुशल बद्रिकेनंतर ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये एन्ट्री, टीझर VIRAL

Madness Machayenge Comedy Show: सोनी टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आता या दोघां पाठोपाठ हास्यजत्रा फेम अभिनेताही दिसणार आहे.
Madness Machayenge Show In Gaurav More
Madness Machayenge Show In Gaurav MoreSaam Tv

Madness Machayenge Show In Gaurav More

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे अभिनेता गौरव मोरे महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झाला. गौरव मोरेने ‘बॉईज ४’, ‘लंडन मिसळ’ सारख्या चित्रपटांतूनही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आपल्या खास विनोदीशैलीमुळे आणि आपल्या अभिनयाच्या माध्यमातून गौरवने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तून गौरवने सध्या ब्रेक घेतला आहे. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर गौरव एका कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच त्या कॉमेडी शोचा टीझर इन्स्टाग्राम व्हायरल होत असून अद्याप अभिनेत्याने त्याच्या नव्या प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना माहिती दिलेली नाही.

Madness Machayenge Show In Gaurav More
Bade Miyan Chote Miyan World Wide Day 1 Collection: ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई, पाहा कलेक्शनचा आकडा

गेल्या काही दिवसांपूर्वी सोनी टेलिव्हिजनवर ‘मॅडनेस मचाएंगे’ हा कार्यक्रम टेलिकास्ट झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आता त्या दोघां पाठोपाठ हास्यजत्रा फेम गौरव मोरेही प्रक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने आजारी असल्याचं कारण सांगत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला सोडचिठ्ठी दिली होती. तो पुन्हा एकदा परतणार अशी चर्चा होती, पण अशातच गौरव आता थेट हिंदी कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार आहे. हास्यजत्रेमुळे गौरवला फार मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. हिंदी कॉमेडी शोमुळे गौरव मोरे सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. (Hindi Television)

‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ अशी गौरव मोरेची सर्वत्र ओळख आहे. आता त्याची हिच ओळख फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर, हिंदी सिनेसृष्टीतही पाहायला मिळणार आहे. गौरव मोरे हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’ या शोच्या माध्यमातून आता प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या टीझरमधून गौरव, हेमांगी आणि कुशल हे तिघंही एकत्रित स्किट करताना दिसत आहे. मराठी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केल्यानंतर आता हे त्रिकूट हिंदी प्रेक्षकांचेही निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यांच्या ह्या टीझरला प्रेक्षकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (Television Show)

Madness Machayenge Show In Gaurav More
Sankarshan Karhade: 'संकर्षणबरोबर लग्न करायचं आहे असं आईला म्हटलं...'; अभिनेत्याने सांगितला चाहतीचा ‘तो’ किस्सा

गौरव मोरेला हास्यजत्रेतून फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्याला हास्यजत्रेतून 'फिल्टर पाड्याचा बच्चन' म्हणून ओळख मिळाली आहे. गौरव हास्यजत्रेव्यतिरिक्त इतर प्रोजेक्ट्स मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गौरव मोरे गेल्यावर्षी 'अंकुश', 'बॉइज ४', 'सलमान सोसायटी', 'लंडन मिसळ' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर लवकरच प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेल्या 'महापरिनिर्वाण' चित्रपटातही गौरव मोरे दिसणार आहे. (Entertainment News)

Madness Machayenge Show In Gaurav More
Vitthala Tuch: माणसा माणसांत दडलेला विठ्ठल 'विठ्ठला तूच' मधून येणार भेटीला, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com