Vitthala Tuch: माणसा माणसांत दडलेला विठ्ठल 'विठ्ठला तूच' मधून येणार भेटीला, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

Vitthala Tuch Movie: विठुरायाला साकड घालणारा आणि विठुरायाची एक झलक पाहण्यासाठी सुरू असलेली धडपड आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. पंढरपूरच्या विठुरायाला हाक देणारा 'विठ्ठला तूच' हा चित्रपट लवरकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
Vitthala Tuch Marathi Movie
Vitthala Tuch Marathi MovieSaam Tv

Vitthala Tuch Marathi Movie

मराठी सिनेरसिकांसाठी हे वर्ष खूपच खास ठरलेलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून मराठीमध्ये अनेक चांगल्या धाटणीचे आणि कंटेट असलेले चित्रपट भेटीला येत आहेत. काही चित्रपटांची घोषणा झाली आहे तर काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच आता आणखी एका चित्रपटाची सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे. विठुरायाला साकड घालणारा आणि विठुरायाची एक झलक पाहण्यासाठी सुरू असलेली धडपड आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाला हाक देणारा 'विठ्ठला तूच' हा चित्रपट येत्या ३ मे पासून थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (Marathi Actors)

Vitthala Tuch Marathi Movie
Emraan Hashmi And Mallika Sherawat: २० वर्षांनंतर इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत दिसले एकत्र, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आली ‘कहो ना कहो’ची आठवण

आजकाल चित्रपटांमधील गाणी ही बरीच लोकप्रिय होत आहेत. या चित्रपटातील 'विठ्ठला तूच तूच तू' या गाण्यालाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. हे गाणं सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेत राहिलेलं गाणं आहे. आतापर्यंत प्रेक्षकांच्या समोर चित्रपटातील गाणंच भेटीला आलेलं आहे. नुकतंच चित्रपटाची रिलीज डेटही प्रेक्षकांसमोर आलेली आहे. विठ्ठल हा प्रत्येकात असतो आणि तो वेगवेगळ्या रूपात प्रत्येकाची मदत, प्रत्येकाची सेवा करत असतो याचं हुबेहूब उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे. आशयघन आणि रोमँटिक कथेची सांगड घालणार हा चित्रपट आहे. (Marathi Film)

Vitthala Tuch Marathi Movie
Park Bo-ram Dies : ३० वर्षीय गायिकेचं निधन; मित्रांसोबत मद्य पार्टी करताना अचानक कोसळल्यानंतर उठलीच नाही

'वाय जे प्रॉडक्शन' निर्मित आणि प्रफुल्ल म्हस्के दिग्दर्शित 'विठ्ठला तूच' या चित्रपटात अभिनेता योगेश जम्मा आणि अभिनेत्री उषा बीबे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या कथेची जोड असलेला हा चित्रपट एका वेगळ्या ढंगात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. माणसा माणसांमध्ये दडलेल्या विठ्ठलाचे दर्शन कशाप्रकारे घडू शकत, हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. येत्या ३ मे २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. (Entertainment News)

Vitthala Tuch Marathi Movie
War 2 Shooting Start: Jr NTR ‘वॉर २’च्या शूटिंगसाठी मुंबईत दाखल, हृतिक रोशनसोबत करणार ॲक्शन सीन्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com