Emraan Hashmi And Mallika Sherawat: २० वर्षांनंतर इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत दिसले एकत्र, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आली ‘कहो ना कहो’ची आठवण

Emraan Hashmi And Mallika Sherawat: इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावतच्या भेटी दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या दोघांच्याही भेटीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
Emraan Hashmi And Mallika Sherawat Viral Video
Emraan Hashmi And Mallika Sherawat Viral VideoInstagram

Emraan Hashmi And Mallika Sherawat Viral Video

बॉलिवूड चित्रपट निर्माते आनंद पंडीत यांच्या लेकीच्या लग्नाला अवघं बॉलिवूड अवतरलं होतं. यावेळी शाहरूख खान, सलमान खान, मौनी रॉय, परिणीती चोप्रा, आयुष्मान खुराना, नुशरत भरूच्चा, विद्युत जामवाल, मधुर भांडारकर सह अनेक दिग्गज मंडळी या लग्नासाठी उपस्थित राहिले होते. अशातच इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावतच्या भेटी दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या दोघांच्याही भेटीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. (Bollywood)

(Emraan Hashmi And Mallika Sherawat Unexpected Meet At Wedding Reception After 20 Years)

Emraan Hashmi And Mallika Sherawat Viral Video
Park Bo-ram Dies : ३० वर्षीय गायिकेचं निधन; मित्रांसोबत मद्य पार्टी करताना अचानक कोसळल्यानंतर उठलीच नाही

तब्बल २० वर्षांच्या गॅपनंतर हे दोघेही एकत्र दिसले. दोघांचाही एकत्रित व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांना ‘मर्डर’ चित्रपटाची आठवण झाली आहे. ‘Voompla’ ह्या इन्स्टाग्राम पेजवर दोघांच्याही भेटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. निर्माते आनंद पंडीत यांच्या लेकीच्या लग्नाला या दोघांनी उपस्थिती लावली होती. मल्लिकाने इमरानला पाहताच कमालीची आनंदित होती. दोघांनीही एकमेकांसोबत काही वेळासाठी संवादही साधला. इतक्या वर्षानंतर भेट झाल्यामुळे दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. यावेळी दोघांनीही पापाराझींसमोर कॅमेरा पोझेसदेखील दिलेल्या आहेत. (Viral Video)

Emraan Hashmi And Mallika Sherawat Viral Video
War 2 Shooting Start: Jr NTR ‘वॉर २’च्या शूटिंगसाठी मुंबईत दाखल, हृतिक रोशनसोबत करणार ॲक्शन सीन्स

लग्नासाठी इमरान हाश्मीने ब्लॅक सूट वेअर केलेला होता. तर मल्लिका शेरावतने पिंक गाऊन वेअर केलेला होता. दोघेही या लूकमध्ये कमालीचे सुंदर दिसत होते. दोघांच्याही फॅशनचे चाहते कौतुक करीत आहेत. (Bollywood News)

दोघांच्याही भेटी दरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक युजर्सला ‘मर्डर’ चित्रपटातल्या ‘कहो ना कहो’ गााण्याची आठवण आली. तर अनेक युजर्सने ‘मर्डर ४’ची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत दोघेही प्रमुख भूमिकेत दिसावे, अशीही इच्छा व्यक्त केली आहे.

२००४ मध्ये रिलीज झालेल्या ‘मर्डर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या माध्यमातून इम्रान आणि मल्लिका यांच्या नशीबाला कलाटणी मिळाली. दोघेही या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आले. चित्रपटासोबतच गाणीही सुपरहिट ठरली. चित्रपटाची निर्मिती मुकेश भट्ट यांनी केली होती. तर अनुराग बसू यांनी दिग्दर्शन केले होते. (Entertainment News)

Emraan Hashmi And Mallika Sherawat Viral Video
Sayaji Shinde Health Update: ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर एन्जोप्लास्टी, डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com