War 2 Shooting Start: Jr NTR ‘वॉर २’च्या शूटिंगसाठी मुंबईत दाखल, हृतिक रोशनसोबत करणार ॲक्शन सीन्स

War 2 Film: ‘वॉर २’साठी ज्युनियर एनटीआर गुरूवारी मुंबईत पोहोचला आहे. शुक्रवारपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
War 2 Shooting Start
War 2 Shooting StartSaam Tv

War 2 Shooting Start

यशराज फिल्म्स स्टुडिओजच्या स्पाय युनिव्हर्स चित्रपटांमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांचा समावेश होतो. ‘एक था टायगर’, ‘टायगर झिंदा है’, ‘वॉर’, ‘पठान’ आणि ‘टायगर ३’ नंतर ‘वॉर २’. ‘वॉर २’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

मोस्ट अवेटेड चित्रपटांमध्ये ‘वॉर २’ चित्रपटाचा समावेश झाला आहे. नुकतीच चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झालेली आहे. ‘वॉर २’साठी ज्युनियर एनटीआर गुरूवारी मुंबईत पोहोचला आहे. शुक्रवारपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. अभिनेता मुंबईमध्ये दाखल होताच तो मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

War 2 Shooting Start
Sayaji Shinde Health Update: ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर एन्जोप्लास्टी, डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

निळा शर्ट, टोपी आणि ब्लॅक गॉगल असा अभिनेत्याचा काल लूक पाहायला मिळाला. अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी मुंबईत दाखल होताच तो पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. ‘वॉर २’चे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. ज्युनियर एनटीआरसोबत चित्रपटासाठी हृतिक रोशनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशन या दोघांचाही लवकरच ॲक्शन सीन शूट होणार आहे. ‘वॉर २’ मध्ये कियारा अडवाणी ही मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ पुढच्या वर्षी १४ ऑगस्टला रिलीज होण्याची शक्यता आहे.

War 2 Shooting Start
Eid 2024: किंग खान अन् भाईजानची झलक पाहण्यासाठी अलोट गर्दी, चाहत्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, Video Viral

‘वॉर २’ या चित्रपटाच्या माध्यमातून ज्युनियर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘वॉर २’ हा एनटीआरचा पहिला हिंदी चित्रपट असेल. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ज्युनियर एनटीआर एका महत्त्वाच्या सीक्वेन्सच्या शूटिंगसाठी जवळपास १० दिवस मुंबईत असेल. गेल्या अनेक दिवसांपासून हृतिक रोशन ‘वॉर २’ चित्रपटाची शूटिंग करीत आहे. एनटीआर आणि हृतिक या दोघांचाही एक महत्वाचा ॲक्शन सीन शूट करण्यात येणार आहे. ज्यु. एनटीआर चित्रपटामध्ये एका निगेटिव्ह रोलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. ज्युनियर एनटीआर यापूर्वी कधीही त्या रोलमध्ये दिसला नव्हता. चित्रपटाचा ज्यु. एनटीआरच्या लूकबद्दल चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

War 2 Shooting Start
बॉक्स ऑफिसवर दबदबा कोणाचा, ‘Bade Miyan Chote Miyan’ की ‘Maidaan’? सर्वाधिक कमाई कोणाची?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com