बॉक्स ऑफिसवर दबदबा कोणाचा, ‘Bade Miyan Chote Miyan’ की ‘Maidaan’? सर्वाधिक कमाई कोणाची?

Bade Miyan Chote Miyan Box Office Collection: २०२४ मधील बिग बजेट चित्रपटांच्या यादीत ह्या चित्रपटांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत दोन्हीपैकी कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत.
Bade Miyan Chote Miyan And Maidaan Box Office Collection
Bade Miyan Chote Miyan And Maidaan Box Office CollectionSaam Tv

Bade Miyan Chote Miyan Day 1 Box Office Collection

सध्या बॉक्स ऑफिसवर टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारच्या ‘बडे मियां छोटे मियां’ची आणि अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हे दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘ईद’च्या मुहूर्तावर रिलीज झालेले आहेत. गेले कित्येक दिवसांपासून चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू आहे. २०२४ मधील बिग बजेट चित्रपटांच्या यादीत ह्या चित्रपटांचा समावेश असून तगडी स्टारकास्ट चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे. अशा परिस्थितीत दोन्हीपैकी कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत. जाणून घेऊया, पहिल्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल...

Bade Miyan Chote Miyan And Maidaan Box Office Collection
Suraj Meher: अभिनेता सूरज मेहर याचा साखरपुड्याच्या दिवशीच अपघाती मृत्यू

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, टायगर आणि अक्षयच्या ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी १४.६ कोटींची कमाई केली आहे. तर, अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाने दोन दिवसांत ७. १५ कोटींची कमाई केली आहे. मात्र, हे दोन्ही चित्रपटांचे अंदाजे आकडे आहेत, त्यात बदल होण्याची शक्यता आहे. दोन्ही चित्रपटांच्या कमाईबद्दल सांगायचे तर, टायगर आणि अक्षयच्या ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटाने चांगलीच कमाई केलेली आहे. चित्रपटाने सर्वाधिक कमाई करत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले. लॉकडाऊननंतर, अक्षय कुमारचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले होते. फार मोठ्या ब्रेकनंतर अभिनेता बॉक्स ऑफिसवर आल्याने प्रेक्षक त्याच्या ह्या चित्रपटासाठी आतुर आहेत.

Bade Miyan Chote Miyan And Maidaan Box Office Collection
Bade Miyan Chote Miyan: 'या' पाच कारणांमुळे तुम्हाला आवडेल अक्षय-टायगरचा चित्रपट

तर, अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाबद्दल सांगायचे तर, तो चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमी कमाई करताना दिसत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी फार कमी कमाई केली आहे. दोन्हीही चित्रपट येत्या पहिल्या विकेंडला कशी कमाई करतात. हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘मैदान’ चित्रपट फूटबॉल कोच सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे.

चित्रपटामध्ये अजयने फूटबॉल कोचचे पात्र साकारले. हा चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित झालेला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी २.६ कोटी, तर दुसऱ्या दिवशी ४.५ कोटींची कमाई केलेली आहे. स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात मुख्य भूमिकेत, अजय देवगण, प्रियामणी राजसह अनेक दिग्गज सेलिब्रिटी आहेत.

अमित शर्मा यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केले असून चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. झी स्टुडिओज आणि बायव्ह्यू प्रोजेक्ट्सच्या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती केली.

Bade Miyan Chote Miyan And Maidaan Box Office Collection
Ramayan Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार यशने नाकारली रावणाच्या भूमिकेची ऑफर; मिळणार होते 'इतके' मानधन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com