Bade Miyan Chote Miyan: 'या' पाच कारणांमुळे तुम्हाला आवडेल अक्षय-टायगरचा चित्रपट

Bade Miyan Chote Miyan : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ चा बहुचर्चित चित्रपट बडे मियाँ छोटे मियाँ आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करणार, अशी आशा वर्तवण्यात येत आहे.
Bade Miyan Chote Miyan: 'या' पाच कारणांमुळे तुम्हाला आवडेल अक्षय-टायगरचा चित्रपट

5 Reasons To Watch Bade Miyan Chote Miyan:

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा बडे मियाँ छोटे मियाँ हा सिनेमा चित्रपटगृहात आज रिलीज झालाय. पहिल्या दिवशी चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यास यशस्वी झाल्याचं म्हटलं जात आहे. (Latest News)

'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाबद्दल चाहत्यांनी ट्विटर रिव्ह्ययू दिलेत. हा चित्रपट खूप जास्त मनोरंजन करणारा आहे. यात अ‍ॅक्शन कॉमेडी अशी दोन्ही गोष्टी आहेत. रोमान्स, ड्रामा आणि इमोशन्सने भरलेला हा चित्रपट सर्वांनाच नक्की आवडेल', असं एका प्रेक्षकांना म्हटलंय. हा चित्रपट का पाहावावा किंवा या चित्रपटात अशा पाच गोष्टी आहेत, ज्या माहिती झाल्यानंतर तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहाल.

१. अ‍ॅक्शन करतान दिसणार अक्षय कुमार

अक्षय कुमारचे एका वर्षात अनेक चित्रपट रिलीज होत असतात. त्यात काही चित्रपटात कॉमेडी तर काही चित्रपट ॲक्शनपट असतात. रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'नंतर अक्षय पुन्हा 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये ॲक्शन करताना दिसणार आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्याचा हा अवतार चाहत्यांसाठीही पर्वणी ठरेल.

२. अली अब्बास जफर यांचे दिग्दर्शन

अली अब्बास हे दिग्दर्शक चित्रपटसृष्टीत ॲक्शनपट सिनेमे तयार करण्यासाठी ओळखले जातात. याआधी अब्बासने सलमान खानसोबत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. आता यांनी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या या चित्रपटाला दिग्दर्शित केले आहे. यामुळे प्रेक्षकांना चित्रपटातील ॲक्शन पाहिला जाऊ शकतो.

३. दोन सुपरस्टार

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. जर ही जोडी प्रेक्षकांना नक्की आवडेल. कारण दोघेही अक्षय आणि टायगर ॲक्शन चित्रपट करण्यासाठी ओळखले जातात.

४. व्हिलेन आहे दमदार

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्येही दमदार खलनायक आहे. मल्याळम चित्रपटाचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका स्वीकारलीय.

५. ईदला प्रदर्शित झाला

ईदचा सणासाठी करमणूक नक्कीच होणार आहे. या खास प्रसंगी बडे मियाँ आणि छोटे मियाँ चित्रपट प्रदर्शित झालाय. या दोन्ही अभिनेत्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच सिनेमागृहात गर्दी करतील. या दोन्ही अभिनेत्याची कॉमेडी आणि अॅक्शन हा बेस्ट ईदी असणार आहे.

Bade Miyan Chote Miyan: 'या' पाच कारणांमुळे तुम्हाला आवडेल अक्षय-टायगरचा चित्रपट
Bade Miyan Chote Miyan Review: अ‍ॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा जबरदस्त डोज; अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' चाहत्यांना कसा वाटला?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com