Bade Miyan Chote Miyan Review: अ‍ॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा जबरदस्त डोज; अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' चाहत्यांना कसा वाटला?

Bade Miyan Chote Miyan Public Review: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ चा बहुचर्चित चित्रपट बडे मियाँ छोटे मियाँ आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करणार असल्याचे दिसत आहे. चित्रपटाबद्दल चाहत्यांनी सोशल मीडियावर रिवीव दिले आहेत.
Bade Miyan Chote Miyan Movie Public Review
Bade Miyan Chote Miyan Movie Public ReviewSaam Tv

Twitter Review Of Bade Miyan Chote Miyan Movie:

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ चा बहुचर्चित चित्रपट बडे मियाँ छोटे मियाँ आज प्रदर्शित झाला आहे. ईदच्या मूहूर्तावर जगभरात चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करणार असल्याचे दिसत आहे. चित्रपटाबद्दल चाहत्यांनी सोशल मीडियावर रिवीव दिले आहेत.

बडे मिया छोटे मिया चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाबद्दल चाहत्यांनी ट्विटर रिवीव दिले आहे. चित्रपटाबद्दल एका युजरने म्हटलं आहे की, '3.5/5, हा चित्रपट खूप जास्त मनोरंजन करणार आहे. यात अॅक्शन कॉमेडी अशी दोन्ही गोष्टी आहे. रोमान्स, ड्रामा आणि इमोशन्सने भरलेला हा चित्रपट सर्वांनाच नक्की आवडेल'. (Latest Entertainment News)

चित्रपटाबद्दल ट्विटरवर युजरने म्हटलं आहे की, 'बडे मियाँ छोटे मियाँ हा अॅक्शन असलेला चित्रपट आहे. चित्रपटाची स्टोरीलाइन ही अॅक्शन चित्रपटासाठी वाईट आहे. चित्रपटातील फाईट सीन्स वाईट पद्धतीने दाखवण्यात आले आहेत'.

बडे मिया छोटे मिया चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहेत. चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात संमिश्र प्रतिक्रिया आहेत. अनेकांनी चित्रपटातील अॅक्शन आवडली आहे. तर अनेकांना सीन्स आवडले नसल्याचे दिसत आहे.

Bade Miyan Chote Miyan Movie Public Review
Trupti Khamkar: १२ तासाची शिफ्ट, पण काम फक्त अर्ध्या तास; अभिनेत्री तृप्ती खामकरने सांगितला 'क्रू' चित्रपटाच्या सेटवरील अनुभव

'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटात टायगर श्रॉफ, अजय देवगन, मनुशी चिल्लर, सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत झळकत आहे. चित्रपटाचे बजेट ३०० ते ३५० कोटी रुपये असून चित्रपट येत्या काही दिवसांत चांगली कमाई करेन अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.

Bade Miyan Chote Miyan Movie Public Review
Munawar Faruqui: बिग बॉस फेम मुनव्वर फारुकीवर हल्ला, लोकांकडून अंडी फेक, Video Viral

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com