Ramayan Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार यशने नाकारली रावणाच्या भूमिकेची ऑफर; मिळणार होते 'इतके' मानधन

Yash Rejected Ramayan Movie Role: रणबीर कपूच्या 'रामायण' चित्रपटाची सध्या खूप जास्त चर्चा सुरु आहे. चित्रपटातील रावणाच्या भूमिकेसाठी दाक्षिणात्य अभिनेता यशची चर्चा सुरु होती. मात्र, आता चित्रपटात यश रावणाच्या भूमिकेत दिसणार नसल्याचे समोर आलं आहे.
Actor Yash
Actor YashSaam Tv

KGF Fame Actor Yash Rejected Ramayan Movie Role

रणबीर कपूच्या 'रामायण' चित्रपटाची सध्या खूप जास्त चर्चा सुरु आहे. चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील रावणाच्या भूमिकेसाठी दाक्षिणात्य अभिनेता यशची चर्चा सुरु होती. मात्र, आता चित्रपटात यश रावणाच्या भूमिकेत दिसणार नसल्याचे समोर आलं आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार यश हा रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता यशने चित्रपटाची ऑफर नाकारली असल्याचे समोर आले आहे. यशला रावणाची भूमिका साकारण्यासाठी ८० कोटींचे मानधन देण्यात येणार होते. मात्र, त्याने ही ऑफर नाकारली आहे. (Latest News)

काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक नितिश तिवारी यांनी चित्रपटाचे शुटिंग सुरु केले आहे. चित्रपटातील रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरने ट्रेनिंग सुरु केले आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चित्रपटाचे शुटिंग सुरु झाले आहे. तर यशने चित्रपटाची ऑफर नाकारली आहे. त्यामुळे आता रावणाच्या भूमिकेत कोणता कलाकार दिसणार आहे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Actor Yash
Salman Khan New Movie: सलमान खानचे चाहत्यांना ईदचे मोठे गिफ्ट; नव्या चित्रपटाची घोषणा

रिपोर्टनुसार, यशने 'रामायण' चित्रपटाची ऑफर नाकारली असून तो आता अभिनेता म्हणून चित्रपटात दिसणार नाहीये. मात्र, तो निर्माता म्हणून चित्रपटाचे काम पाहणार आहे. चित्रपटात रणबीर कपूर रामाची भूमिका तर दाक्षिणात्य अभिनेत्री सई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे.

Actor Yash
Harshali Malhotra : चाँद नजर आया...'बजरंगी भाईजान' फेम मुन्नीने व्हिडिओ शेअर करत दिल्या ईदच्या शुभेच्छा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com