Salman Khan New Movie: सलमान खानचे चाहत्यांना ईदचे मोठे गिफ्ट; नव्या चित्रपटाची घोषणा

Salman Khan New Movie Announcement: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा चित्रपट हा ईदला प्रदर्शित होणार हे ठरलेलं असतं. परंतु यंदा भाईजानचा चित्रपट रिलीज झालेला नाहीये. परंतु सलमान खानचा नवीन चित्रपट पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे.
Salman Khan New Movie Sikandar
Salman Khan New MovieSaam Tv

Bollywood Actor Salman Khan Share a Poster Of His New Movie On Eid 2024:

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा चित्रपट हा ईदला प्रदर्शित होणार हे ठरलेलं असतं. दरवर्षी ईदच्या दिवशी सलमान खानचा चित्रपट प्रदर्शित होतो. परंतु यंदा भाईजानचा चित्रपट रिलीज झालेला नाहीये. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत होती. परंतु आता सलमान खानने ईदच्या दिवशी चाहत्यांना नवीन चित्रपटाची घोषणा करत खुशखबर दिली आहे. (Latest News)

सलमान खानचा नवीन चित्रपट पुढच्या वर्षीच्या ईद मूहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानने सोशल मीडियावर नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर करत माहिती दिली आहे. 'सिकंदर'(Sikandar)असे सलमानच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. ए. आर. मुरगदास या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाहीये.(Salman Khan New Movie)

Salman Khan New Movie Sikandar
Bade Miyan Chote Miyan: अ‍ॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा जबरदस्त डोज; अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' चाहत्यांना कसा वाटला?

सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 'या वर्षी ईदला बडे मियाँ, छोटे मियाँ चित्रपट बघा आणि पुढच्या ईदला सिकंदरला भेटायला या. तुम्हाला सर्वांना ईद मुबारक'. असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे.

'सिकंदर' हा चित्रपट प्रसिद्ध निर्माते साजिद नाडियालवाला यांच्या बॅनरखाली निर्मित होणार आहे. सलमान खानचा हा नवीन चित्रपट चाहत्यांसाठी मोठं गिफ्ट असल्याचे म्हणायला हरकत नाही. सलमान खानचा याआधी दरवर्षी ईदला नवीन चित्रपट प्रदर्शित व्हायचा. मात्र, यावर्षी सलमान खानने हा नियम मोडला असला तरीही त्याने नव्या चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

Salman Khan New Movie Sikandar
Harshali Malhotra : चाँद नजर आया...'बजरंगी भाईजान' फेम मुन्नीने व्हिडिओ शेअर करत दिल्या ईदच्या शुभेच्छा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com