भारतीतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानीचे प्री-वेडिंग फंक्शन या महिन्याच्या सुरूवातीला गुजराच्या जामनगरमध्ये पार पडले होते. तीन दिवसांच्या या सोहळ्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावत चार चाँद लावले होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगमध्ये (Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding) बॉलिवूडच्या तिन्ही खानने म्हणजे शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानने खूप धम्माल केली. पण या कार्यक्रमादरम्यान सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यामध्ये वाद झाला होता. त्याचा व्हिडीओ सध्या समोर आला असून तो तुफान व्हायरल होत आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमध्ये सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खानने स्टेजवर एकत्र येत 'RRR'चित्रपटातील सुपरहिट गाणं 'नाटू-नाटू' वर अफलातून डान्स केला. या डान्स परफॉर्मन्सवेळी तिघांनी देखील आपल्या प्रसिद्ध चित्रपटांमधील सिग्नेचर स्टेप्स देखील केल्या. तिघांना एकत्र डान्स करताना पाहून त्यांचे चाहते आश्चर्यचकीत झाले होते. यावेळी तिन्ही खानला एकत्र डान्स करताना पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद देखील झाला. पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख आणि सलमानमध्ये गाण्यावरून वाद झाल्याचे दिसत आहे. हा एक प्रँक व्हिडीओ असून तो सध्या चर्चेत आला आहे.
स्टेजवर शाहरुख-सलमान आणि आमिर हे तिघे जण उभे राहिलेले दिसत आहेत. यावेळी शाहरुख म्हणतो की, 'मुकेश भाईंची एक इच्छा आहे की आपण तिघांनी अनंत आणि राधिकासाठी एकत्र डान्स करावा. यानंतर सलमान आणि आमिर दोघेही शाहरुखच्या म्हणण्याला हो बोलतात. सलमान म्हणतो हम साथ साथ है! त्यावेळी सलमान पुढे जाऊन म्हणतो, 'दबंग'मधील गाणं लावा, आपण त्यावर डान्स करूया 'हुड हुड दबंग दबंग'. यावर शाहरुख आक्षेप घेतो आणि म्हणतो की, 'आम्ही तुझे गाणे का वाजवू, माझे गाणं वाजवू. 'बेशरम रंग' गाणं लावूया आपण.' तेव्हा सलमान म्हणतो, गाणं पण काय तर बेशरमीचे गाणं. तेव्हा शाहरुख म्हणतो की, सलमान बेशरमीची गोष्ट करू नको. त्यावर सलमान म्हणतो की, 'इतका चांगला क्षण आहे, तू हे बेशरम गाणं का वाजवणार?'
यावर शाहरुख खान म्हणतो,'गाणं तुझं नाही तर माझं होणार.' त्यावर सलमान म्हणतो, 'गाणं माझं होणार.' दोघांमध्ये माझं गाणं- माझं गाणं असा वाद होतो. या दोघांच्या वादात आमिर खान उडी मारतो आणि दोघांना भांडण मिटवायला सांगतो. आमिर खान म्हणतो,'तुम्ही दोघे पुन्हा भांडत आहात.' यावर सलमान-शाहरुख म्हणतात कुठे भांडत आहोत. ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात. आमिर पुढे म्हणतो की, सलमान खान आणि शाहरुख खान दोघेही भांडत आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नामध्ये तुम्ही भांडत आहात. हे काय आहे.'
आमिर पुढे म्हणतो, 'सलमान तुझं गाणं नाही होणार, शाहरुख तुझंही गाणं नाही होणार. माझं गाणं वाजणार. त्यावर सलमान-शाहरुख म्हणतात मेरी माँ. तर आमिर म्हणतो माँ नाही तर बाप. आपण माझे गाणे वाजवूया... पापा कहते है.' यावर शाहरुख-सलमान खान म्हणतात पापा कधीपासूनच बोलत आले आहेत.' अशापद्धतीने हे तिन्ही खान गाण्यावरून भांडण करत असतात. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. या वादानंतर तिघांन्ही आरआरआर चित्रपटातील 'नाटू-नाटू' गाण्यावर जबरदस्त डान्स केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.