Shubman Gill Wicket: गिल शॉक, यश ठाकूर रॉक्स! वाऱ्याच्या वेगाने चेंडू टाकून उडवली दांडी,पाहा Video

Yash Thakur Clean bowled Shubman Gill: लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात यश ठाकूरने शानदार गोलंदाजी केली. त्याने शुभमन गिलला बाद करत माघारी धाडलं.
yash thakur stunned shubman gill in lsg vs gt match shubman gill wicket amd2000
yash thakur stunned shubman gill in lsg vs gt match shubman gill wicket amd2000twitter

Shubman Gill- Yash Thakur,IPL 2024:

लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात यश ठाकूरने शानदार गोलंदाजी केली. या सामन्यात तो अचूक टप्पा आणि भन्नाट वेगाने गोलंदाजी करताना दिसून आला. यादरम्यान त्याने गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिलची दांडी गुल केली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

यश ठाकूरने टाकला आयपीएल २०२४ स्पर्धेतील सर्वोत्तम चेंडू..

लखनऊ आणि गुजरात यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात यश ठाकूर चर्चेत राहिला. मोठ मोठ्या दिग्गज गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या शुभमन गिलला त्याने क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं. मुख्य बाब म्हणजे शुभमन गिलला हा चेंडू कळलाच नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

yash thakur stunned shubman gill in lsg vs gt match shubman gill wicket amd2000
MI vs DC, IPL 2024: ४,६,६,६,४,६... वानखेडेवर शेफर्डचं वादळ! नॉर्खियाला धू धू धुतला - Video

तर झालं असं की, गुजरात टायटन्स संघाची फलंदाजी सुरू असताना लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून सहावे षटक टाकण्यासाठी यश ठाकूर गोलंदाजीला आला. या षटकातील शेवटचा चेंडू त्याने असा काही टाकला, जो गिलला कळणार इतक्यात त्याची दांडी गुल झाली होती. गिल या डावात २१ चेंडूत १९ धावा करत माघारी परतला. (Cricket news in marathi)

या सामन्यात मार्कस स्टोइनिसने तुफान फटकेबाजी करत ५८ धावा चोपल्या. तर गोलंदाजी करताना यश ठाकूरने ३० धावा खर्च करत ५ गडी बाद केले. या शानदार कामगिरीच्या बळावर लखनऊ सुपर जायंट्स संघाने गुजरात टायटन्स संघावर ३३ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने २० षटकअखेर ५ गडी बाद १६३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा डाव १३० धावांवर आटोपला.

yash thakur stunned shubman gill in lsg vs gt match shubman gill wicket amd2000
MI vs DC, IPL 2024: मुंबईला अखेर विजयाचा सूर गवसला! शेफर्डच्या वादळानं पलटणचा दिल्लीवर शानदार विजय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com