MI vs DC, IPL 2024: मुंबईला अखेर विजयाचा सूर गवसला! शेफर्डच्या वादळानं पलटणचा दिल्लीवर शानदार विजय

Mumbai Indians vs Delhi Capitals: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २० वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.
MI vs DC IPL 2024 Mumbai indians beat delhi capitals mi vs dc match highlights amd2000
MI vs DC IPL 2024 Mumbai indians beat delhi capitals mi vs dc match highlights amd2000twitter

MI vs DC, Match Highlights:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २० वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात अखेर मुंबई इंडियन्स संघाला विजयाचा सूर गवसला आहे. हा सामना मुंबईने २९ धावांनी जिंकला आहे. हा मुंबईचा या हंगामातील पहिलाच विजय ठरला आहे.

मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला विजयासाठी २३५ धावांचं आव्हान दिलं होतं. या डोंगराइतक्या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. संघातील अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर अवघ्या १० धावा करत माघारी परतला.

MI vs DC IPL 2024 Mumbai indians beat delhi capitals mi vs dc match highlights amd2000
RR vs RCB,IPL 2024: RCB चं नेमकं चुकलं तरी कुठं? ही आहेत पराभवाची ३ मोठी कारणं

तर पृथ्वी शॉने ६६ धावा चोपल्या. त्याला चांगली साथ देत अभिषेक पॉरेलने ४१ धावा केल्या. शेवटी ट्रिस्टन स्टब्सने विस्फोटक खेळी केली. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शेवटी दिल्लीला हा सामना २९ धावांनी गमवावा लागला आहे.

MI vs DC IPL 2024 Mumbai indians beat delhi capitals mi vs dc match highlights amd2000
MI vs DC, IPL 2024: ४,६,६,६,४,६... वानखेडेवर शेफर्डचं वादळ! नॉर्खियाला धू धू धुतला - Video

मुंबईने उभारला २३४ धावांचा डोंगर...

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. मुंबई इंडियन्स संघाकडून इशान किशन आणि रोहित शर्मा ही जोडी मैदानावर आली होती. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८० धावा जोडल्या. चांगली सुरुवात मिळालेला रोहित शर्मा ४९ धावांवर माघारी परतला.

तर इशान किशन ४२ धावा करत माघारी परतला. आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या सूर्यकुमार यादवला या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नाही. मात्र शेवटी रोमारियो शेफर्ड आणि टीन डेव्हिडने महत्तपूर्ण खेळी करत संघाला २३४ धावांपर्यंत पोहचवलं. डेव्हिडने ४५ धावा केल्या. तर शेफर्ड नाबाद ३९ धावांवर माघारी परतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com