War 2 Release Date: हृतिक रोशन- ज्युनिअर एनटीआरचा 'वॉर 2' च्या रिलीज डेटची घोषणा, या दिवशी येतोय भेटीला

War 2 Movie Released Date Announcement: चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटर हँडलवर हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'वॉर 2' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली आहे.
War 2 Movie
War 2 MovieSaam Tv

War 2 Movie:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि साऊथ स्टार ज्युनियर एनटीआर (Junior NTR) यांच्या बहुप्रतीक्षित 'वॉर 2' (War 2) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

2019 मध्ये रिलीज झालेल्या 'वॉर' चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची मागणी करत होते. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे 'वॉर 2' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. 'वॉर 2' चित्रपट कधी रिलीज होणार याची प्रेक्षक वाट पोहत होते. आता 'वॉर 2' चित्रपटाची रिलीज डेटबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटर हँडलवर हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'वॉर 2' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, 'YRF स्पाय युनिव्हर्सच्या सहाव्या चित्रपट 'वॉर 2' ची रिलीज डेट समोर आली आहे. अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेला हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.'

YRF या चित्रपटाची निर्मिती करत आहे. हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'वॉर 2' या चित्रपटाची रिलीज डेट समोर आल्यानंतर चाहते उत्साहित झाले आहेत. 14 ऑगस्ट 2025 रोजी गुरुवार येत आहे. त्यामुळे वीकेंडसोबत तुम्हाला एक अतिरिक्त दिवस मिळेल. त्याचवेळी स्वातंत्र्यदिनाचे निमित्त असल्याने चित्रपटाची कमाई वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निर्मात्यांनी प्लानिंगसह 'वॉर 2' चित्रपटाची रिलीज डेट निवडली असल्याचे सांगितले जात आहे.

War 2 Movie
Prathamesh Parab: अखेर दगडूला प्राजू भेटलीच, प्रथमेश परबच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का?; म्हणते - 'माझ्यासाठी जगाचा अर्थ...'

दरम्यान, 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'वॉर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'वॉर' चित्रपटात हृतिक रोशनसोबत टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर दिसले होते. 'वॉर' चित्रपटातील जबरदस्त अॅक्शन सीनने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती.

War 2 Movie
Pooja Sawant: 'माझ्यासोबत घडणारी सर्वांत चांगली गोष्ट तू आहेस...', पूजा सावंतने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com