Eid 2024: किंग खान अन् भाईजानची झलक पाहण्यासाठी अलोट गर्दी, चाहत्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, Video Viral

Shah Rukh Khan And Salman Khan: सालाबादप्रमाणे यंदाही ईद निमित्ताने सलमान खानच्या आणि शाहरूख खानच्या घराबाहेर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाईजानला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती, यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज झाला.
Shah Rukh Khan And Salman Khan Eid 2024 News
Shah Rukh Khan And Salman Khan Eid 2024 NewsInstagram

Shah Rukh Khan And Salman Khan Eid 2024 News

सालाबादप्रमाणे यंदाही ईद निमित्ताने सलमान खानच्या आणि शाहरूख खानच्या घराबाहेर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ईदच्या दिवशी आपल्या आवडत्या सेलिब्रिटींची खास झलक पाहायला मिळावी, असं चाहत्यांना कायमच वाटतं. त्यामुळे भाईजानच्या आणि किंग खानच्या घराबाहेर चाहत्यांनी तुडूंब गर्दी केलेली होती.

सलमान खानच्या वांद्र्यातील घराबाहेर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली असता, यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. भाईजानची झलक पाहण्यासाठी चाहते घराबाहेर थांबले होते. सध्या लाठीचार्जचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.

Shah Rukh Khan And Salman Khan Eid 2024 News
बॉक्स ऑफिसवर दबदबा कोणाचा, ‘Bade Miyan Chote Miyan’ की ‘Maidaan’? सर्वाधिक कमाई कोणाची?

सलमाननं ईदनिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. "ईद मुबारक" असं कॅप्शन देत अभिनेत्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. सलमान खान आणि वडिल सलीम खान दोघेही एकत्र उपस्थित होते. दोघांनीही चाहत्यांना हात दाखवत नमस्कार करुन या जमावाला अभिवादन केले व त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

काल दुपारी सलमानच्या घराच्या बाहेर एकच गर्दी उसळली होती. यावेळी गर्दीमुळे चेंगराचेंगरीही झाली. एकाच वेळी आलेली ही गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. ही गर्दी नियंत्रणात न आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. २०२४ मध्ये ईदच्या मुहूर्तावर सलमानचा कोणताही चित्रपट रिलीज झाला नाही. पण सलमानने यावर्षी त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. एआर मुरुगादोस दिग्दर्शित 'सिकंदर' या चित्रपटातून सलमान प्रेक्षकांच्या भेटीला पुढच्या वर्षी येणार आहे.

Shah Rukh Khan And Salman Khan Eid 2024 News
Suraj Meher: अभिनेता सूरज मेहर याचा साखरपुड्याच्या दिवशीच अपघाती मृत्यू

शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेरही त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी शाहरुखनं मन्नतच्या गॅलरीमध्ये येऊन चाहत्यांना शुभेच्छा दिला. यावेळी शाहरुखसोबत त्याचा मुलगा अबराम खान देखील दिसला. "सर्वांना ईद मुबारक… माझा दिवस इतका खास बनवल्याबद्दल धन्यवाद. अल्लाह आपल्या सर्वांना प्रेम, आनंद आणि समृद्धी देवो" असं कॅप्शन देत शाहरूखने व्हिडीओ शेअर केलेला आहे. व्हिडीओमध्ये मन्नत बाहेर झालेली किंग खानच्या चाहत्यांची गर्दी दिसत आहे.

Shah Rukh Khan And Salman Khan Eid 2024 News
Bade Miyan Chote Miyan: 'या' पाच कारणांमुळे तुम्हाला आवडेल अक्षय-टायगरचा चित्रपट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com