Salman Khan House : सलमान खानला नाही जायचे सोडून गॅलेक्सी अपार्टमेंट ; नेमकं काय आहे प्रकरण?

सलमान खानला गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर सोडून इतरत्र कुठेही राहायचे नाही.
Salman Khan House
Salman Khan HouseSaam Tv

मुंबई : सुपरस्टार सलमान खान(Salman Khan) बॉलिवूडचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. एकीकडे सलमान खानची कमाई कोट्यवधींमध्ये आहे, तर दुसरीकडे हा अभिनेता पनवेलमधील फार्महाऊसपासून अनेक मौल्यवान मालमत्तांचा मालक आहे. पण सलमान खानच्या चाहत्यांना हे जाणून आश्चर्य वाटेल की तो ज्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो ते त्याच घर त्याच्या इतर प्रॉपर्टीच्या तुलनेत खूपच लहान आहे. एका मुलाखतीदरम्यान सलमान खानने स्वत: सांगितले होते की, तो या छोट्या अपार्टमेंटमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासह(Family) खूप आनंदाने राहतो.

Salman Khan House
Swara Bhaskar: साथीदार शोधणे म्हणजे कचरा...; स्वरा भास्कर हे असं का म्हणाली?

यासोबतच दबंग खानने असेही सांगितले होते की, त्याचे वडील सलीम खान या घराव्यतिरिक्त कुठेही राहू इच्छित नाहीत. सलीम खानची या अपार्टमेंटशी भावनिक जोड आहे. त्यामुळे त्यांनी अनेकवेळा घराचे नूतनीकरण करून घेतले पण हे घर कधीही बदलले नाही. आता तर सलमान खानलाही वडिलांप्रमाणे हे घर सोडून इतरत्र कुठेही राहायचे नाही.

Salman Khan House
Brahmastra Box Office Collection: रणबीर-आलियाच्या चित्रपटाने पार केला 100 कोटींचा टप्पा; तिसऱ्या दिवशी केला इतका व्यवसाय

सलमान खान नेहमी त्याच्या या घराचे काही आतील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. हे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर, हे स्पष्ट होते की सलमान खानचे घर इतर सेलिब्रिटींसारखे भव्य किंवा आलिशान नाही परंतु तो आपल्या संपूर्ण कुटुंबासह येथे आनंदाने राहतो. संपूर्ण कुटुंब एकाच छताखाली वेगवेगळे सणसमारंभ मोठ्या जालोशाने साजरा करत असतात.

सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये त्याच्या आई-वडिलांसोबत राहत आहे. एका मासिकातील माहितीनुसार, त्याचे आई-वडील अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहतात, तर सलमान खान तळमजल्यावर राहतो. अनेकदा सलमान खान त्याचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करतो, ज्यामध्ये त्याच्या घराची झलक पाहायला मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com