Sayaji Shinde Health Update: ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर एन्जोप्लास्टी, डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

Sayaji Shinde Went Through Heart Surgery in Satara: ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली आहे.
Sayaji Shinde Health Update: Famous Actor Sayaji Shinde Had Angioplasty As He Felt Pain In Heart
Sayaji Shinde Health Update: Famous Actor Sayaji Shinde Had Angioplasty As He Felt Pain In Heart Saam Tv

Sayaji Shinde Health Update

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल त्यांच्यावर एन्जोप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली आहे. छातीत दुखत असल्याने त्यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या त्यात त्यांच्या हृदयाची एक व्हेन ब्लॉक असल्याचे समजल्या नंतर तात्काळ एन्जिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. (Actor Sayaji Shinde Health Update)

Sayaji Shinde Health Update: Famous Actor Sayaji Shinde Had Angioplasty As He Felt Pain In Heart
Eid 2024: किंग खान अन् भाईजानची झलक पाहण्यासाठी अलोट गर्दी, चाहत्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, Video Viral

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हेल्थबद्दल हृदयविकार तज्ञ डॉ .सोमनाथ साबळे यांनी सांगितले की, “गेल्या काही दिवसांपूर्वी सयाजी शिंदे यांच्या छातीमध्ये अचानक दुखू लागल्याने त्यांनी साताऱ्यामध्ये काही तपासण्या करून घेतल्या होत्या. त्यांच्या चेकअपमध्ये इसीजीमध्ये काही बदल जाणवले. त्यांची टू डी इको कार्डियोग्राफी केली, त्यामध्ये हृदयाच्या छोट्या भागाची हालचाल व्यवस्थित होत नसल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यांचं स्ट्रेस चेकअपही करण्यात आलं. त्यातही काही दोष जाणवले.”

Sayaji Shinde Health Update: Famous Actor Sayaji Shinde Had Angioplasty As He Felt Pain In Heart
बॉक्स ऑफिसवर दबदबा कोणाचा, ‘Bade Miyan Chote Miyan’ की ‘Maidaan’? सर्वाधिक कमाई कोणाची?

हेल्थबद्दल पुढे डॉक्टरांनी सांगितले की, “त्यांना काही वर्षांपूर्वी हृदयासंबंधित थोडासा त्रास जाणवलं होतं. त्यावेळी त्यांना आम्ही एन्जोग्राफी करून घेण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांच्या व्यग्र शेड्युल्ड त्यांना वेळ मिळाला नाही. नुकतंच त्यांच्या एका चित्रपटाची शुटिंग कॅन्सल झाल्यामुळे सयाजी शिंदे साताऱ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी एन्जोग्राफी करण्याचा निर्णय घेतला.काल त्यांची एन्जोग्राफी करण्यात आली. हृदयाच्या तीन पैकी दोन रक्त वाहिन्या अगदी सुरळीत काम करीत आहे. पण उजव्या बाजुच्या रक्तवाहिन्यांमध्ये तोंडाकडे ९९ % चा ब्लॉक अढळला. नेमका तो ब्लॉक केव्हा तयार झाला, हे कळू शकलं नाही. त्यांनी लवकरात लवकर एन्जोग्राफी केल्यामुळे हार्ट ॲटेक येण्याआधी स्वत:चा बचाव केला आहे. त्यांची तब्येत उत्तम असून त्यांना उद्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याचा प्रयत्न करतोय.”

Sayaji Shinde Health Update: Famous Actor Sayaji Shinde Had Angioplasty As He Felt Pain In Heart
Suraj Meher: अभिनेता सूरज मेहर याचा साखरपुड्याच्या दिवशीच अपघाती मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com