Bade Miyan Chote Miyan च्या शुटिंग दरम्यान अक्षय कुमारच्या पायाला झाली होती दुखापत, तरीही अभिनेत्याने पूर्ण केलं चित्रीकरण

Bade Miyan Chote Miyan Film: हाय-ऑक्टेन आणि ॲक्शन-पॅक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अक्षय कुमारच्या पायाला दुखापत झाली होती. निर्मात्यांनी ट्रेलिंग लाँचिंगवेळी ट्रेलरबद्दल आठवण सांगितली.
Bade Miyan Chote Miyan Shooting Akshay Kumar Injured
Bade Miyan Chote Miyan Shooting Akshay Kumar InjuredSaam Tv

Akshay Kumar Injured

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) हा आगामी चित्रपट येत्या ११ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्कंठा बरीच वाढल्याचं पाहायला मिळतंय. नुकताच चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल फारच उत्सुकता आहे. ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये, चित्रपटाच्या निर्मात्याने खिलाडी कुमारच्या कामाबद्दल भाष्य केले आहे. (Bollywood)

Bade Miyan Chote Miyan Shooting Akshay Kumar Injured
Daniel Balaji Dies: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; चाहत्यांवर दु:खाचा डोंगर

हाय-ऑक्टेन आणि ॲक्शन-पॅक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा निर्मात्यांनी एक किस्सा शेअर केला होता. अक्षय कुमारच्या पायाला दुखापत झाल्याची आठवण त्यांनी सांगितली. निर्माते जॅकी भगनानी म्हणतो, "'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या शूटिंगदरम्यान अक्षयच्या पायाला दुखापत झाली होती. पण तरीही त्याने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. जर अक्षयच्या जागी दुसरा कोणता अभिनेता असता तर, त्याने शूटिंग पॅक अप केली असती. पण त्याने पूर्ण चित्रपटाची शूटिंग अगदी व्यवस्थित रित्या पूर्ण केली. " सध्या सोशल मीडियावर अक्षयच्या पायाला दुखापत झाल्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत.  (Bollywood Film)

अवघ्या काही तासांपूर्वी ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या सेलिब्रिटी फोटोग्राफरने याबद्दलचे काही फोटो शेअर केलेले आहेत. त्या फोटोमध्ये अक्षयने पायाला बँडेज लावून शूटिंग पूर्ण केलेली दिसत आहे. सध्या अक्षय कुमारचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.

कामाप्रती असलेले प्रेम पाहून त्याचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. येत्या ११ एप्रिलला म्हणजेच ईदच्या दिवशी अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट रिलीज होणार आहे. (Bollywood Actor)

चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर, अलाया एफ आणि जुगल हंसराज दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना खूपच आवडला असून काही दिवसांत या ट्रेलरला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com