Daniel Balaji Dies: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; चाहत्यांवर दु:खाचा डोंगर

Daniel Balaji Death: साऊथ इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ तमिळ अभिनेते डॅनियल बालाजी यांचे निधन झाले.
Daniel Balaji Passed Away
Daniel Balaji Passed AwaySaam Tv

Daniel Balaji Passed Away

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. तमिळ अभिनेते डॅनियल बालाजी यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले आहे. डॅनियल बालाजी यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अगदी कमी वयात अभिनेत्याचे निधन झाल्यामुळे भारतीय सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. (Tollywood)

Daniel Balaji Passed Away
Crew 1st Day Collection: करीना-क्रिती आणि तब्बूच्या 'क्रू'ची पहिल्याच दिवशी कमाईत गगनभरारी, जमावला कोट्यवधींचा गल्ला

डॅनियल बालाजी यांच्या छातीमध्ये दुखू लागल्याने लगेचच त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेत्याला डॉक्टरांकडून वाचवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र सर्व त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. अभिनेत्याच्या एक्झिटने फक्त चाहत्यांवरच नाही तर, त्यांच्या कुटुंबीयांवर आणि सेलिब्रिटी मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डॅनियल यांच्या पार्थिवावर आज (३० मार्च) चेन्नईतल्या पुरसाईवलकममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Actor)

Daniel Balaji Passed Away
Amruta Khanvilkar: आपण वर्षभर काम करतो पण..., अमृता खानविलकरला अपूर्ण राहिलेलं स्वप्न करायचंय पूर्ण

दिग्दर्शक मोहन राजा यांनी डॅनियल बालाजीला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. पोस्ट करत दिग्दर्शक मोहन राजा यांनी लिहिले की, "खूपच दु:खद बातमी आहे. मी डॅनियलचा आदर्श समोर ठेवत, अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. माझ्यासाठी तो एक प्रेरणास्थान तर होताच, पण सोबतच तो एक माझा चांगले मित्र देखील होता. त्याच्यासोबत काम करणे ही माझी एक आठवणच राहिली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली." (Social Media)

डॅनियल बालाजीने आपल्या सिनेकरिअरची सुरुवात कमल हसन यांच्या Marudhanayagam या चित्रपटातून केली होती, पण त्यांचा तो चित्रपट कधीच रिलीज झाला नाही. यानंतर डॅनियल टिव्ही क्षेत्राकडे वळाले. 'चिट्ठी' मालिकेमुळे डॅनियलला चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळाली.

डॅनियल बालाजी यांनी तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. Vettaiyadu Vilaiyaadu, Polladhavam आणि Vada Chennai यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना ओळखले जाते. साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्यांनी कमल हासन, थलापति विजय आणि सूर्या अशा अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. (Entertainment News)

Daniel Balaji Passed Away
Juna Furniture: महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर'मध्ये दिसणार हे कलाकार, नव्या पोस्टरसोबत पाहा स्टारकास्टची लिस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com