Amruta Khanvilkar: आपण वर्षभर काम करतो पण..., अमृता खानविलकरला अपूर्ण राहिलेलं स्वप्न करायचंय पूर्ण

Amruta Khanvilkar Education: 'लुटेरे'मधून अविकाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारून तिने बॉलिवूड प्रेक्षकांना मोहित केलं आहे. सध्या सगळीकडे अमृताच्या लुटेरेची चर्चा सुरू आहे. अभिनयानंतर आता अमृता खानविलकरला तिचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करायचे आहे.
Amruta Khanvilkar
Amruta KhanvilkarSaam Tv

Amruta Khanvilkar Movie:

मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चर्चेत आहे. अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) 'राझी', 'सत्यमेव जयते' आणि 'मलंग' नंतर लुटेरे मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपलंसं केलं. हॉटस्टार वरच्या या अफलातून वेब सीरिजमधून अमृता खानविलकर सध्या बॉलिवूड गाजवत आहे.

'लुटेरे'मधून अविकाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारून तिने बॉलिवूड प्रेक्षकांना मोहित केलं आहे. सध्या सगळीकडे अमृताच्या लुटेरेची चर्चा सुरू आहे. अभिनयानंतर आता अमृता खानविलकरला तिचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करायचे आहे. अमृताला उच्च शिक्षण घ्यायचे आहे. नुकताच तिने याबद्दल सांगितले.

'लुटेरे'मधून बॉलिवूड आणि OTT दोन्ही विश्वात अमृता पुन्हा चर्चेत असताना तिच्या प्रभावशाली अभिनयाचं कौतुक होतंय. प्रत्येक कलाकाराला अभिनायच्या पलिकडे जाऊन आपण काहीतरी वेगळं करावं असं नक्कीच वाटून जात आणि असंच काही अमृताच्या बाबतीत घडतंय. अमृता सध्या लुटेरेमध्ये अविकाची भूमिका साकारताना दिसत असली तरी तिच प्रमोशन दणक्यात सुरू आहे. अशाच एका प्रमोशनदरम्यान अमृताने तिला आयुष्यात अजून काहीतरी खास करायचं आहे याबद्दल सांगितलं.

लुटेरे वेबसीरिजनंतर पुढे काय करायचं याबद्दल अमृता खानविलकरने प्रेक्षकांना एक छोटी हिंट दिली आहे. याबद्दल सांगताना अमृता म्हणाली की, 'अभिनय नवनवीन भूमिका प्रोजेक्ट्स सगळंच होत राहणार आहे. पण मला अभिनयाच्या सोबतीने मास्टर्ससुद्धा करायचं आहे. मास्टर्स इन लिटरेचर किंवा इन फायनस हे अजून ठरवलं नाही. पण उच्च शिक्षण घेऊन ही एक मास्टर्स करण्याची माझी इच्छा आहे. आपण वर्षभर काम करत असतो पण स्वतःसाठी काहीतरी करावं म्हणून मला मास्टर्स करण्याची खूप इच्छा आहे.' दरम्यान, अमृता आगामी काळात अनेक हिंदी आणि मराठी प्रोजेक्ट्समध्ये दर्जेदार भूमिका करणार आहे. 'कलावती', 'ललिता बाबर', 'पठ्ठे बाबूराव' यासारख्या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार आहे.

Amruta Khanvilkar
Juna Furniture: महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर'मध्ये दिसणार हे कलाकार, नव्या पोस्टरसोबत पाहा स्टारकास्टची लिस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com