Crew 1st Day Collection: करीना-क्रिती आणि तब्बूच्या 'क्रू'ची पहिल्याच दिवशी कमाईत गगनभरारी, जमावला कोट्यवधींचा गल्ला

Crew Box Office Collection: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान, क्रिती सेनॉन आणि तब्बू स्टारर 'क्रू' चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी दमदार प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.
Crew 1st Day Box Office Collection
Crew 1st Day Box Office CollectionSaam Tv

Crew 1st Day Box Office Collection

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), क्रिती सेनॉन (Kriti Senon) आणि तब्बू (Tabbu) स्टारर 'क्रू' चित्रपट (Crew Movie) अखेर २९ मार्चला अर्थात काल थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटाला पहिल्याच दिवशी दमदार प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. प्रेक्षकांकडून पहिल्याच दिवशी चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळालेला आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल... (Bollywood)

Crew 1st Day Box Office Collection
Amruta Khanvilkar: आपण वर्षभर काम करतो पण..., अमृता खानविलकरला अपूर्ण राहिलेलं स्वप्न करायचंय पूर्ण

एअर होस्टेसच्या भूमिकेत करीना कपूर, क्रिती सेनॉन, तब्बू दिसणार आहे. या तिघींभोवती चित्रपटाचे कथानक आहे. खुर्चीला खिळवून ठेवणारे हे कथानक प्रेक्षकांना प्रचंड भावलेले आहे. नुकतंच सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्टने चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई सांगितली आहे. राजेश ए. कृष्णन दिग्दर्शित चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ८.७५ कोटींची कमाई केलेली आहे. यंदा बॉलिवूडचे चित्रपट गेल्या वर्षीप्रमाणे बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरत आहेत. अशातच हा चित्रपट म्हणजे, आशेचा किरण असल्याचे दिसत आहे. चित्रपट विकेंडमध्ये आणखी चांगली कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. (Bollywood Film)

दरम्यान, 'क्रू' ने आपल्या ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शनमध्ये ४४३१ शोसाठी ३१,१२६ तिकिटे विकली होती. चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच सुमारे ७२ लाख रुपयांची कमाई केली होती. तर अभिनेत्री करीना कपूर 'क्रू' या चित्रपटाद्वारे बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. याआधी करीना कपूर मोठ्या पडद्यावर आमिर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसली होती. चित्रपटामध्ये करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त कपिल शर्मा आणि दिलझीत दोसांझही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा तीन महिलांवर आधारित आहे. या तिनही महिला एअरलाईन उद्योगातील संघर्ष आणि अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. (Entertainment News)

Crew 1st Day Box Office Collection
Juna Furniture: महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर'मध्ये दिसणार हे कलाकार, नव्या पोस्टरसोबत पाहा स्टारकास्टची लिस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com