Rohini Gudaghe
पायांमध्ये सूज येणं हे हार्ट अटॅकचं सगळ्यात कॉमन लक्षण आहे. एक्सपर्ट्सच्या मते जेव्हा हृदय व्यवस्थित काम करत नाही. तेव्हा पायांमध्ये सूज येते.
हार्ट अटॅक येण्याअगोदर अनेकदा पोट फुगण्याची समस्या जाणवते.
हृदयाशी संबंधित आजारांमुळे शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो.
हार्ट अटॅक येण्याअगोदर थकवा जाणवतो. अशा वेळी लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.
हार्ट अटॅक येण्याअगोदर पचनासंबंधित समस्या जाणवतात. सतत पोटात किंवा छातीत जळजळ होणं, ही हृदयाशी संबंधित समस्यांचं संकेत असू शकतं.
छातीत दुखत असेल किंवा जर गुदमरल्यासारखं वाटत असेल, तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.
हृदय धडधडणे, अति विचार किंवा दृष्टी बदल, भूक न लागणे, हात पायांना मुंग्या येणे ही सगळी हार्ट अटॅकची लक्षणं आहेत.
लठ्ठपणा, डायबिटीस, हाय कोलेस्टेरॉल, हाय बिपी, धुम्रपान, मद्यपान, हाय फॅट डायट ही हार्ट अटॅकची कारणं आहेत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.