Extreme Stress: प्रमाणापेक्षा जास्त स्ट्रेस घेताय? चिडचिड होतेय? मनाला कसे कराल शांत

Depression : सतत चिंता केल्याने आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.
Extreme Stress
Extreme StressSaam Tv
Published On

Stress Management : चिंता ही चितेसारखी असते असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. सतत चिंता केल्याने आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून आपल्याला बरेचदा चिंतामुक्त राहण्याचा सल्ला दिला जातो.

सततच्या चिंतेमुळे आपण डिप्रेशनमध्ये जाण्याचा धोका वाढतो. चिंता केल्यामुळे आपण अनेक आजारांदेखील बळी पडतो. वेगवेगळ्या कारणांमुळे येणारा ताण हा नेहमी त्रासदायक असतो. त्यामुळे ऑफिस व घरात देखील त्याचा प्रभाव पडतो. ही स्थिती कधी कधी सहन करण्याच्या पलिकडची होते. अशावेळी रागाला नियंत्रणात ठेवण्यासाठी, चिडचिड कमी करण्यासाठी व मनाला शांत करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी जाणून घेऊया

Extreme Stress
Mental Stress Disease : मानसिक तणावामुळे वाढतोय जीवघेण्या आजारांचा धोका !

1. ताण का येतो?

मानसिक ताण (Mental Health) अनेक कारणांमुळे येऊ शकतो. सहसा मैत्री किंवा प्रेमात विश्वासघात, पैशांची कमतरता, बेरोजगारी, अपूर्ण इच्छा, कोणताही दीर्घ आजार, परीक्षेत अपयश, लग्न होऊ न शकणे, कुटुंबापासून (Family) दूर राहणे, मुले न होणे, टेन्शन, इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स सारख्या कारणांमुळे तणाव येऊ शकतो, परंतु आपण काही गोष्टींची काळजी घेऊन तणाव दूर करू शकता.

Extreme Stress
Most Dangerous Fort In Maharashtra: डोळ्यांना स्वर्ग सुख देणारा महाराष्ट्रातील खतरनाक किल्ला, संध्याकाळ होण्यापूर्वीच परतावे लागते

2. अशा प्रकारे तणाव दूर करा

1. मित्र आणि कुटूंबासोबत वेळ घालवा

जेव्हा तुम्ही अस्वस्थ असता तेव्हा तुमच्या मनात अनेक प्रकारची नकारात्मकता येऊ लागते, हे टाळण्यासाठी जर तुम्ही तुमच्या मित्र (Friends) आणि कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवला तर मन हलके होऊन तणाव दूर होण्यास मदत होते.

2. दिनचर्या

जर तुम्ही नियमितपणे खाणे, पिणे आणि झोपत असाल तर दैनंदिन जीवनातील ही दिनचर्या योग्यप्रकारे ठेवा. अनेकदा तणावाच्या काळात आपल्याला काही करावेसे वाटत नाही, परंतु आपण दिनचर्या नियमितपणे योग्य ठेवल्यास आरोग्य चांगले राहील. आणि हळूहळू ताणही कमी होऊ लागतो.

Extreme Stress
Famous Hill Stations in Konkan : डोळ्यांचे पारणं फेडणारं अन् निसर्गाच्या कुशीत वसेललं कोकणातील घाट

3. आवडते काम

जर तुम्हाला नैराश्य टाळायचे असेल तर तुम्ही प्रवास करणे, चित्रपट पाहणे, आवडते पदार्थ खाणे, क्रिकेट, फुटबॉल किंवा कुस्ती पाहणे इ. यामुळे तणाव सहज दूर होऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com