Suriya In Bollywood Movie : दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्या हा लोकप्रिय अभिनेता आहे. साउथच्या सिंघम या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. त्याला अनेक अवॉर्डसनेही सन्मानित करण्यात आले आहे. आता हा दाक्षिणात्या स्टार बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू आहे. सुर्या हा साउथ सुपरस्टार आहे. तो आता त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटामध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
मीडियाच्या वृत्तानुसार 'रंग दे बंसती' आणि 'भाग मिल्खा भाग' नंतर आता राकेश ओम प्रकाश मेहरा महाभारतावर आधारित 'कर्ण' चित्रपट करणार आहे. या चित्रपटातून सुपररस्टार सुर्या हिंदीमध्ये डेब्यु करण्याची शक्यता आहे. (Latest Entertainment News)
'कर्ण' या चित्रपटाचे दोन भाग येणार असून या दोन्ही भागात सुर्या दिसणार असल्याचं म्हटल जात आहे. हा चित्रपट महाभारतातील कर्णावर आधारित असणार आहे. रामायणावर आधारित चित्रपटानंतर आता महाभारतावर आधारित नवीन चित्रपट येणार असल्याची माहिती मिळत आहे.
पिंकवीलाच्या वृत्तानुसार, सुर्या आणि राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्यात बऱ्याच काळापासून कर्ण या चित्रपटावर बोलणं सुरू आहेत. सुर्या देखील या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं म्हटल जात आहे. चित्रपटामध्ये सुर्या हा कर्णच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०२४मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
'कर्ण' हा राकेश ओम प्रकाशसाठी खूप मोठा प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचे काम खूप दिवसांपासून सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. कर्ण हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार असल्याच सांगण्यात येत आहे. हा चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सुपरस्टार सुर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर सुर्या त्याचा आगामी चित्रपट 'कंगुवा'च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत वागेल ट्रेंड पाहायला मिळत आहे. अनके बॉलिवूड कलाकार दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहेत. तर दाक्षिणात्य कलाकार बॉलिवूडमध्ये दिसणार आहेत. यात जान्हवी कपूर, इम्रान हाश्मी, राम चरण, ज्युनिअर एनटीआर यांसह अनेक कलाकारांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.